महाराष्ट्र

maharashtra

कधी येत आहे यंदाचा पितृपक्ष ? या तारखेला करा श्राध्द

By

Published : Sep 16, 2021, 6:07 PM IST

Updated : Sep 16, 2021, 7:16 PM IST

Pitru Paksha
Pitru Paksha

पितृपक्षाच्या काळात आपल्या पूर्वजांसाठी मनापासून श्राद्ध केल्यास, त्यांचे सर्व त्रास दूर होतात. पितृपक्षात दान केल्याने कुंडलीतील पितृदोष दूर होतो, असे मानले जाते.

हैदराबाद - यंदाचा पितृपक्ष 20 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीपर्यंत चालेल. या दरम्यान पिंडदान, तर्पण, हवन आणि अन्नदान याला विशेष महत्व मानले जाते.

पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान अर्पण करण्याचा नियम देखील सांगितला आहे. पितृपक्षाचे (Pitru Paksha 2021) हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. याची सुरुवात भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होते. आणि अश्विन महिनाच्या अमावास्येला याची सांगता होते. यंदाचा पितृपक्ष 20 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत असेल. या 16 दिवसांमध्ये पूर्वजांसाठी श्राद्ध केले जाते. या काळात आपले पूर्वज त्यांच्या मोक्ष मिळवण्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात, असे मानले जाते. त्यामुळे या कालावधीत पिंडदान, तर्पण, हवन आणि अन्नदानाला विशेष महत्व आहे.

पितृपक्षाचे महत्व

श्राद्ध पक्षाच्या वेळी, पूर्वज त्यांच्या नातेवाईकांच्या हातातून तर्पण स्विकारतात. या दरम्यान, पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान अर्पण करण्याचा नियम देखील पुराणात सांगितला आहे. या काळात आपल्या पूर्वजांसाठी मनापासून श्राद्ध केल्यास, त्यांचे सर्व त्रास दूर होतात. पितृपक्षात दान केल्याने कुंडलीतील पितृदोष दूर होतो. जे श्राद्ध करत नाहीत, त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्यांना मोक्ष मिळत नाही. म्हणून पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी पूर्वजांचे श्राद्ध आवश्यक मानले जाते.

या तारखांना करा हे श्राध्द

20 सप्टेंबर (सोमवार) 2021- पहिले श्राद्ध, पूर्णिमा श्राद्ध

21 सप्टेंबर (मंगळवार) 2021- दुसरे श्राद्ध, प्रतिपदा श्राद्ध

22 सप्टेंबर (बुधवार) 2021- तिसरे श्राद्ध, द्वितीय श्राद्ध

23 सप्टेंबर (गुरूवार) 2021- चौथे श्राद्ध, तृतीया श्राद्ध

24 सप्टेंबर (शुक्रवार) 2021- पाचवे श्राद्ध, चतुर्थी श्राद्ध

25 सप्टेंबर (शनिवार) 2021- सहावे श्राद्ध, पंचमी श्राद्ध

27 सप्टेंबर (सोमवार) 2021- सातवे श्राद्ध, षष्ठी श्राद्ध

28 सप्टेंबर (मंगळवार) 2021- आठवे श्राद्ध, सप्तमी श्राद्ध

29 सप्टेंबर (बुधवार) 2021- नववे श्राद्ध, अष्टमी श्राद्ध

30 सप्टेंबर (गुरूवार) 2021- दहावे श्राद्ध, नवमी श्राद्ध (मातृनवमी)

01 अक्टोंबर (शुक्रवार) 2021- अकरावे श्राद्ध, दशमी श्राद्ध

02 अक्टोंबर (शनिवार) 2021- बारावे श्राद्ध, एकादशी श्राद्ध

03 अक्टोंबर 2021- तेरावे श्राद्ध, वैष्णवजनांसाठी श्राद्ध

04 अक्टोंबर (रविवार) 2021- चौदावे श्राद्ध, त्रयोदशी श्राद्ध

05 अक्टोंबर (सोमवार) 2021- पंधरावे श्राद्ध, चतुर्दशी श्राद्ध

06 अक्टोंबर (मंगळवार) 2021- सोळावे श्राद्ध, अमावस्या श्राद्ध

हेही वाचा -गुजरात: भूपेंद्र पटेल मंत्रिमंडळात 'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; जुन्या सर्व मंत्र्यांना वगळले!

Last Updated :Sep 16, 2021, 7:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details