ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी 41 जण मैदानात; निवडणूक विभागानं 33 उमेदवारांना दाखवला 'घरचा रस्ता' - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 11:38 AM IST

Lok Sabha Election 2024 : वाराणसी लोकसभा मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तब्बल 41 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज छाननीत 33 अर्ज बाद ठरवण्यात आले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात 8 उमेदवार रिंगणात आहेत.

Lok Sabha Election 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Reporter)

लखनऊ Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी वाराणसीतून तब्बल 41 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले होते. मात्र अर्ज छाननीनंतर 8 उमेदवारचं रिंगणात आहेत. अर्जात तृटी असल्यानं निवडणूक आयोगानं तब्बल 33 उमेदवारांना घरचा रस्ता दाखवला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार अजय राय, बहुजन समाज पक्षाचे अथर जमाल लारी आणि इतर अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

कॉमेडियन श्याम रंगीलाचा नामांकन अर्ज बाद : वाराणसीचे जिल्हाधिकारी एसराज लिंगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नामनिर्देशनपत्र योग्य आढळणाऱ्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र काही उमेदवारांच्या नामांकन पत्रात त्रृटी आढळून आल्यानं त्यांचा नामांकन अर्ज फेटाळण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात रान गाजवणाऱ्या कॉमेडियन श्याम रंगीला याचाही नामांकन अर्ज बाद करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एसराज लिंगम यांनी दिली. कॉमेडियन श्याम रंगीला याच्या पोस्टला उत्तर देताना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्यानं आणि तुम्ही शपथ घेत नसल्यामुळे तुमचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. याबाबत ऑर्डरची एक प्रत तुम्हाला देण्यात आली आहे, अशी माहिती दिली आहे.

भाजपाच्या माजी आमदाराचाही नामांकन अर्ज फेटाळला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजपाचे माजी आमदार सुरेंद्र नारायण सिंह यांनीही अर्ज दाखल केला. मात्र जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज फेटाळला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्या पत्नी रिना राय यांचा अर्ज डमी उमेदवार म्हणून नामंजूर करण्यात आला. वाराणसीमध्ये 1 जूनला मतदान होणार आहे. यासाठी 7 मे ते 14 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. एकूण 41 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

हेही वाचा :

  1. भाजपाला पोराचं होत नाही, म्हणून नकली संतान मांडीवर घेतली..., उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात - Uddhav Thackeray
  2. जिरेटोप घातला आता पीएम मोदींना सिंहासनावरही बसवणार का?...; प्रफुल्ल पटेल यांनी माफी मागावी - आनंद दवे - Anand Dave On Praful Patel
  3. "मोदींनी दहा वर्षे फक्त थापा मारल्या, पुन्हा निवडून आल्यास..."उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल - uddhav thackeray interview
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.