ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंना भेटण्यावरून महिला पदाधिकारी संतप्त, चंद्रकांत खैरेंनी जोडले हात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 5:31 PM IST

Ambadas Danve reaction
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : दोन तास थांबूनही उद्धव ठाकरेंना भेटू न दिल्यानं शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. पुरुष पदाधिकारी भेटतात, मात्र महिलांबाबत नकारात्मक दृष्टिकोन का, असा सवाल महिला पदाधिकाऱ्यांनी केला.

अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर Uddhav Thackeray : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या महिला पदाधिकारी चांगल्याच संतप्त झाल्याचं बुधवारी पाहायला मिळालं. हॉटेल रामात उद्धव ठाकरे मुक्कामी होते. त्यावेळी सकाळपासूनच अनेक पदाधिकारी त्यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत होते. त्यात महिला पदाधिकाऱ्यांना सुरक्षा रक्षकांनी रोखल्यानं त्या संतप्त झाल्या. नेहमीच अशी वागणूक मिळत असल्याची संतप्त भावना महिलांनी व्यक्त केली. यावेळी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यांना हात जोडून शांत राहण्याचा सल्ला देत निघून जाण्यास सांगितलं. तर महिलांचा गैरसमज झाल्याचं, मत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलंय.

पुरुष पदाधिकाऱ्यांना नियमित भेटतात : उद्धव ठाकरे सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं दौऱ्यावर आहेत. यादरम्यान बुलढाणा येथे जाताना ते संभाजीनगर शहरातील रामा हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले होते. पुढील दौऱ्यावर निघण्यापूर्वी असलेल्या वेळेत त्यांची भेट घेण्यासाठी अनेक पदाधिकारी हॉटेलमध्ये दाखल झाले होते. सकाळी आठ वाजेपासून अनेक महिला पदाधिकारी देखील त्यांची भेट घेण्यासाठी थांबल्या होत्या. मात्र, ते कोणालाच भेटणार नाही, असा संदेश महिलांना देण्यात आला. इतकच नाही, तर सुरक्षारक्षकांनी त्यांना बाजूला जायला सांगितल्यानं या सर्व महिला पदाधिकारी संतप्त झाल्या. त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला अशीच वागणूक मिळत महिलांनी यावेळी सागितलंय. फक्त पुरुष पदाधिकाऱ्यांना नियमित भेटू दिलं जात, मात्र महिलांची विचारपूसही केली जात नाही, भेट झाली तरी न बोलता नुसतं हात जोडून निघून जातात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

नेत्यांची जोडले जात : महिला पदाधिकाऱ्यांचा गोंधळ सुरू असतानाच त्यावेळी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे दाखल झाले. त्यावेळी या महिलांना त्यांनी शांत करत प्रसिद्धी माध्यमांना कृपया हे काही दाखवू नका, अशी विनंती केली. तर सर्व महिला पदाधिकाऱ्यांसमोर हात जोडून शांत रहा, इथून जा असं त्यांनी महिलांना सांगितलं. त्यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत खैरे आमच्यावर चिडतात, मात्र तेच आम्हाला सांभाळून घेतात, असं देखील त्यांनी सांगितलं. यावर बोलताना काही तरी गैरसमज झाला आहे. उद्धव ठाकरे आराम करत असून त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे, हे देखील आपलंच काम आहे. ते काहीतरी काम करत असतील, त्यामुळं ते कोणाला भेटले नसतील. त्यामुळं शिवसेना कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, असं मत विरोधीपक्ष अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं.

हे वाचलंत का :

  1. Vijay Shivtare: शिवतारेंमुळं महायुतीत मिठाचा खडा? ...तर आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही, अजित दादांच्या कार्यकर्त्यांचा इशारा
  2. Sanjay Raut: राज ठाकरे यांच्या मनातील संवेदना मला अधिक माहिती, त्यांचे व्यंगचित्र बोलके - संजय राऊत
  3. Yugendra Pawar : श्रीनिवास पवारांची 'नालायक' म्हणत अजित पवारांवर टीका? मुलानं केली सारवासारव
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.