बारामती Yugendra Pawar On Srinivas Pawar Statement : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्यात संघर्ष पाहायला मिळतोय. कार्यकर्ते, पदाधिकारी तसंच नेते मंडळी दोन्ही पवारांच्या बाजूनं गेलेले पाहायला मिळतंय. असं असताना श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना नालायक म्हटलं, त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. यावरच आता श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले होते श्रीनिवास पवार? : काटेवाडी इथं झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार म्हणाले की, आजपर्यंत मी नेहमी अजित पवार यांच्या मागं उभा राहिलो आहे. भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं, पण आता नाही. या वयात शरद पवारांची साथ सोडणं चुकीचं असून अजित पवारांचा निर्णय पटला नसल्याचं यावेळी श्रीनिवास पवार यांनी बोलून दाखवलं. तसंच याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं असल्याचं देखील श्रीनिवास पवार म्हणाले. यावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाल्याचं बघायला मिळांलं.
वडिलाच्या विधानावर मुलाचं स्पष्टीकरण : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना युगेंद्र पवार म्हणाले की, "बापूंचा स्वभाव आणि बापू कसे आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे. बापू सरळ आणि स्पष्ट बोलणारे आहेत. परंतु त्यांच्या बोलण्याला वेगळा ट्विस्ट देण्यात आलाय, तसं त्यांना बोलायचं नव्हतं. शेवटी ते भाऊच. भावाचं नातं कधीच तुटत नसतं." तसंच आमच्या आजीच्या वाढदिवसानिमित्त दादा आणि बापू एकत्र आले होते. दादांवर बापूंचं प्रेम आहे, मात्र राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं असतं. काटेवाडीतील मित्रांना आणि तेथील पुढारी लोकांना उद्देशून बापूंनी ते वक्तव्य केलं होतं. दादांना बापू कधीच असं बोलणार नाही, असंही युगेंद्र पवार म्हणाले.
हेही वाचा -
- Srinivas Pawar : पुतण्यानंतर सख्खा भाऊ आणि वहिनी अजित पवारांच्या विरोधात; 'दादां'विरोधात सर्व कुटुंब एकत्र?
- Vijay Shivtare vs Ajit Pawar: 'लक्षात घ्या, दादाच ठरवतात पुरंदरचा विजय'; पुण्यात शिवतारेंच्या विरोधात बॅनरबाजी
- Pawar election symbol tussle : अजित पवार यांना घड्याळ चिन्ह वापरण्यास कोर्टाची सशर्त परवानगी; शरद पवारांना 'तुतारीवाला माणूस' बहाल