ETV Bharat / state

राम मंदिर उद्‌घाटन सोहळ्या निमित्त राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसच्यावतीनेही मुंबईत जल्लोष आणि आरती

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2024, 9:23 PM IST

NCP Ram Mandir Utsav : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनानिमित्त आज मुंबई विभागीय कार्यालयासमोर लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (Ram Mandir Inauguration) प्रभू रामाच्या प्रतिमेला प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पुष्पहार अर्पण केला. तसंच पूजा करून आरतीही केली. (Ayodhya Ram Temple)

NCP Ram Mandir Utsav
मुंबईत जल्लोष आणि आरती

मुंबई NCP Ram Mandir Utsav : पाचशे वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर आज (22 जानेवारी) अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. (MP Sunil Tatkare) आज मंगलमय वातावरणात देशातील कोट्यवधी जनतेनं या मंगलमय क्षणाचे जयघोषात स्वागत केले. (Politics) आज आपण प्रभू रामचंद्राच्यासमोर नतमस्तक होत असताना या देशात पुन्हा एकदा रामराज्याची संकल्पना अधिक गतीमान होणार असून या भावनेतून आपण सारेजण जमलो आहोत. त्यामुळेच (Maharashtra Politics) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या मंगलमय क्षणाच्या राज्यातील तमाम जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या. (India Politics)

राम उत्सव निमित्त लाडू वाटप : अयोध्येत राममूर्ती प्रतिष्ठापणा सोहळा संपन्न झाल्यानंतर मुंबईतही महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने जल्लोष साजरा केला. तसंच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रभू रामाच्या प्रतिमेसमोर आरती केली. तसंच पूजाअर्चा करून उपस्थितांना लाडू वाटपही केले.

'या' मान्यवरांची उपस्थिती : यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, पक्षाचे कोषाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, आमदार शेखर निकम, कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, सुनिल गिरी, महिला कार्याध्यक्षा आरती साळवी, मनिषा तुपे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.

प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेचा सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे. मुंबईसह राज्यभरात त्यासाठी विविध कार्यक्रम करण्यात आले. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या सर्वच कार्यक्रमात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं.


हेही वाचा:

  1. श्रीरामाचा तंबूतला 500 वर्षाचा वनवास संपला, भव्यदिव्य मंदिरात विराजमान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
  2. आजचा दिवस ऐतिहासिक, 'याची डोळा याची देह' हा क्षण बघायला मिळणं म्हणजे श्रीरामाचा आशीर्वाद आहे- देवेंद्र फडणवीस
  3. श्रीराम प्रतिष्ठापने निमित्त 6 हजार किलोचा 'रामशिरा'; मंदिरांच्या नावानं आशिया बुक मध्ये नवा विक्रम
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.