ETV Bharat / bharat

श्रीरामाचा तंबूतला 500 वर्षाचा वनवास संपला, भव्यदिव्य मंदिरात विराजमान : पंतप्रधान नरेंद्र मोदी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2024, 4:08 PM IST

Updated : Jan 22, 2024, 9:01 PM IST

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत श्री राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तब्बल 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी (22 जानेवारी) भगवान श्री राम भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संत समाज आणि प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत राम लल्लाच्या मूर्तीचा अभिषेक करण्याचा ऐतिहासिक विधी पूर्ण झाला.

Etv Bharat
पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण

अयोध्या Ram Mandir Pran Pratishtha : लाखो रामभक्तांच्या उपस्थितीत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हजारो क्विंटल फुलांनी अयोध्या नगरी नवरीसारखी सजवण्यात आली. श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामभक्तांना संबोधित केलं. आमचे रामलल्ला तंबूत राहणार नसून, ते आता भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. आजच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी तब्बल 500 वर्षाचा प्रदीर्घ काळ लागला. त्यामुळं प्रभू राम आपल्याला नक्कीच क्षमा करतील, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

श्रीराम भव्यदिव्य मंदिरात विराजमान : आज आमचे राम घरी आलेत. अनेक वर्षानंतर आज आपल्याला श्री रामाचं मंदिर सापडलं आहे. गुलामगिरीची मानसिकता मोडून राष्ट्र उभं राहिलं. 500 वर्षाचा हा काळ सामान्य नाही. प्रदीर्घ वियोगामुळं आलेला त्रास आता संपला आहे.राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतरही भगवान श्रीरामाच्या अस्तित्वावरून कायदेशीर लढाई लढली गेली. अखेर श्रीराम आपल्या भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले याचा प्रचंड आनंद असल्याची भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली.

श्रीराम शांती, संयमचे प्रतीक : काही लोक 'राम मंदिर बना तो आग लगेगी' असं म्हणायचे, अशा लोकांना भारताच्या सामाजिक भावनेची शुद्धता समजू शकली नाही. राम लल्ला हे भारतीय समाजाच्या शांती, संयम, परस्पर सौहार्द आणि समन्वयाचे प्रतीक आहेत. राम मंदिर हे ऊर्जेला जन्म देत आहेत, अशी भावनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात व्यक्त केली.

रामापासून राष्ट्राकडं जाण्याचा प्रयत्न : प्रभू श्रीरामाचे विचार जनमाणसात रुजवावेत, हिच राष्ट्रनिर्माणाची पायरी आहे. आपल्या चेतनाचा विस्तार करावा लागेल. देवापासून देशाकडं आणि रामापासून राष्ट्राकडं जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे करत असताना हनुमानाची निष्ठा, त्यांची सेवा, समर्पण हे गुण आपल्याला घ्यावे लागतील. प्रत्येक भारतीयामध्ये भक्ती, सेवा आणि समर्पणाचे भाव ही सक्षम भारताचा आधार बनतील, असं मत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं.

देशभरात जल्लोषाचं वातावरण : बहुप्रतिक्षेत असलेला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा भव्य सोहळा पार पडला. पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गज या कार्यक्रमात सहभागी झाले होते. राम मंदिरातील रामलल्लाचं रुप भक्तांना पाहायला मिळालं. तसंच देशभरात जय श्री रामाच्या नावाचा जयघोष पाहायला मिळत आहे.

हेही वाचा -

  1. राम मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न, सोनू आणि शंकर यांनी गायली भजन
  2. सोलापूरच्या चित्रकाराची अनोखी रामभक्ती; रक्ताने साकारली प्रभू श्री रामांची प्रतिमा
  3. राम लल्ला हे शांती, संयम, समन्वयाचे प्रतीक : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Last Updated : Jan 22, 2024, 9:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.