ETV Bharat / bharat

राम लल्ला हे शांती, संयम, समन्वयाचे प्रतीक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2024, 7:16 AM IST

Updated : Jan 22, 2024, 3:23 PM IST

Ram Mandir Pran Pratishtha : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत असलेला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आज भव्य सोहळा पार पडला आहे. पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गज या कार्यक्रमात सहभागी झाले. राम मंदिरातील रामलल्लाचं रुप भक्तांना पाहायला मिळालं. तसंच देशभरात जय श्री रामाच्या नावाचा जयघोष पाहायला मिळत आहे.

Ram Mandir Pran Pratishtha
Ram Mandir Pran Pratishtha

अयोध्या Ram Mandir Pran Pratishtha : रामनगरी अयोध्येत आज रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होण्यापूर्वी मंगळवारपासून सहा दिवसीय पूजा करण्यात येत होती. रविवारी पुजेच्या सहाव्या दिवशी भगवान रामाला 125 कलशांच्या पवित्र पाण्यानं स्नान घालण्यात आलं. यानंतर, शयाधिवास पुजेचा एक भाग म्हणून एक अंगाई गाऊन रामांना विश्रांती देण्यात आली. आज सकाळी टाळ्यांच्या गजरात रामलल्लाला जागं करण्यात आलं. डोळे उघडताच त्यांना सर्वात प्रथम आरसा दाखवण्यात आला.

राम लल्ला हे शांती, संयम, समन्वयाचे प्रतीक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

काही लोक 'राम मंदिर बना तो आगे लगेगी' असं म्हणायचे, अशा लोकांना भारताच्या सामाजिक भावनेची शुद्धता समजू शकली नाही. राम लल्ला हे भारतीय समाजाच्या शांती, संयम, परस्पर सौहार्द आणि समन्वयाचे प्रतीक आहेत. राम मंदिर हे ऊर्जेला जन्म देत आहे, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात व्यक्त केली.

डीआरडीओचे माजी प्रमुख डॉ. सतीश रेड्डी म्हणाले, मर्यादा पुरुषोत्तमचे मंदिरात येथे येऊन दर्शन घेणं आणि या कार्यक्रमात सहभागी होताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख, सुनील आंबेकर म्हणतात, "हा एक आनंददायी अनुभव आहे. आम्ही अनेक वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होतो. प्रत्येकजणानं आनंदी व्हावं, ही प्रत्येकासाठी आनंदाची बाब आहे.

  • #WATCH | At Birla Mandir in Delhi, Union Home Minister Amit Shah, Union Minister Meenakashi Lekhi and others watch the live telecast of the Pranpratishtha ceremony underway at Shri Ram Janmabhoomi Temple in Ayodhya.

    Minister Lekhi gets emotional while watching the telecast. pic.twitter.com/LZIuzt8F2I

    — ANI (@ANI) January 22, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • रामल्ला आता तंबुत राहणार नाहीत. अनेक दशकं राम मंदिर झालं नाही. आज ती कमतरता दूर झाली. आजच्या क्षणाचं साक्षीदार होणं भाग्याचं असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. घराघरात रामज्योत प्रज्वलित होईल.
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी दिल्लीतील बिर्ला मंदिरात अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात सुरू असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहिले. हे प्रक्षेपण पाहताना केंद्रीय मंत्री मीनाक्षी भावूक झाल्याचं दिसून आलं.
  • अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठान सोहळ्याला सुरुवात झाली आहे. गणेश पुजनापासून विधीला सुरुवात झाली आहे. मोदींच्या हस्ते गर्भगृहात विधीवत पुजेला सुरुवात झाली आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरात दाखल झाले आहेत. प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याची जय्यत तयार झाली आहे. यापूर्वीच मंगलध्वनीनं कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सोहळ्याला दिग्गज उद्योगपतीदेखील उपस्थित आहेत.
  • #WATCH | Ayodhya, Uttar Pradesh | Actor Anupam Kher says, "Historic! Wonderful! I had never seen such an atmosphere for Hindu religion ever before. This is bigger than Diwali. This is the real Diwali...Maryada Purushottam Ram symbolised goodness and a sense of sacrifice. Today,… pic.twitter.com/zYORDFWvqs

    — ANI (@ANI) January 22, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • अभिनेते अनुपम खेर म्हणाले, हिंदू धर्मासाठी अद्भुत वातावरण आहे. असं वातावरण यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. हीच खरी दिवाळी आहे. मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे त्यागाच्या भावनेचे प्रतीक आहेत. योगगुरू रामदेव म्हणाले, रामलल्ला मंडपात असताना आम्ही येथे आलो. सनातनचा नवा इतिहास आज निर्माण होत आहे. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेने 'रामराज्याची नवी सुरुवात' ' होत आहे.
    • #WATCH | Ayodhya, Uttar Pradesh | Congress leader Acharya Pramod Krishnam says, "This is the day of the rule of Sanatana and re-establishment of 'Ram Rajya'. This day has come after a struggle of centuries and sacrifices of thousands of people...I think this would not have been… pic.twitter.com/45cfxqe9ln

      — ANI (@ANI) January 22, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • 'महाभारत' या दूरचित्रवाणी मालिकेत भगवान कृष्णाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता नितीश भारद्वाज म्हणाले, येथे खूप उत्सवाचे वातावरण आहे. मंदिरातून आपलेला दिसलेला प्राचीन अभिमान दिसून येतो. खूप छान वाटतं आहे.
  • #WATCH | Uttar Pradesh | Bageshwar Dham's Dhirendra Shastri, Yog Guru Ramdev, Swami Chidanand Saraswati arrive at Shri Ram Janmabhoomi Temple in Ayodhya to attend the Pran Pratishtha ceremony pic.twitter.com/YeIDxixdyr

    — ANI (@ANI) January 22, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • अभिनेता जॅकी श्रॉफ म्हणाले, त्यांनी आम्हाला इथे बोलावलं. हे आमच्यासाठी खूप मोठं आहे. आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष, कुमार मंगलम बिर्ला आणि अनन्या बिर्ला अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले आहेत.
  • अभिनेत्री माधुरी दीक्षित, विकी कौशल, कतरिना कैफ, आयुष्मान खुराना, रणबीर कपूर, आलिया भट्ट, निर्माता रोहित शेट्टी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात पोहोचले आहेत.
  • तेलगू सुपरस्टार चिरंजीवी आणि राम चरण हैदराबादहून अयोध्येला रवाना झाले आहेत. विमानमार्गे ते अयोध्येला पोहोचून प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
  • अभिनेता आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि चित्रपट निर्माता रोहित शेट्टी हे राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी मुंबईहून रवाना झाले आहेत.

अभिजीत मुहूर्तावर होणार प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम : राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. 16 जानेवारीपासून मूर्तीच्या अभिषेकाशी संबंधित सर्व पुजा सुरू आहेत. अभिजित मुहूर्तावर शास्त्रीय परंपरेचं पालन करुन प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होणार आहे. अभिजीत मुहूर्त आज दुपारी 12:29 वाजून 8 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंदापर्यंत असेल. रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक 22 जानेवारी 2024 रोजी पौष महिन्याच्या बाराव्या दिवशी, अभिजीत मुहूर्त, इंद्र योग, मृगाशिरा नक्षत्र, मेष लग्न आणि वृश्चिक नवमशा अशा मुहूर्तावर होईल. ही शुभ वेळ 12:29 वाजून 08 सेकंद ते 12:30 वाजून 32 सेकंदांपर्यंत असेल. याचाच अर्थ प्राणप्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त 84 सेकंदाचा असेल.

नरेंद्र मोदींचा असा आहे दिवसभरातील कार्यक्रम :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10.25 वाजता अयोध्या विमानतळावर पोहोचतील.
  • ते सकाळी 10.55 वाजता राम मंदिरात पोहोचतील.
  • दुपारी 12:15 ते 12:45 दरम्यान प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे.
  • दुपारी 12:20 वाजता पंतप्रधान मोदी प्रभू रामाच्या मूर्तीच्या डोळ्यावरची पट्टी काढतील. त्यानंतर आरती केली जाईल.
  • पंतप्रधानांनी रामाचं पहिलं दर्शन घेतल्यानंतर, दुपारी एक वाजल्यापासून इतर भक्तांना एकेक करुन दर्शन घेण्याची परवानगी दिली जाईल.
  • पंतप्रधान हे दुपारी 1 वाजता अयोध्येतील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
  • पंतप्रधान मोदी दुपारी 2:15 वाजता कुबेर तीलावरील शिवमंदिरात दर्शन आणि पूजा करतील.
  • पंतप्रधान सुमारे 4 तास अयोध्येत असणार आहेत.

हेही वाचा :

  1. राम जन्मभूमीचा वाद कोणामुळं सुरू झाला? वादग्रस्त जागेभोवती कुंपण कोणी अन् का लावलं?; जाणून घ्या A टू Z इतिहास
  2. घरी कशी करावी प्रभू श्रीरामाची पूजा? जाणून घ्या संपूर्ण विधी
Last Updated : Jan 22, 2024, 3:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.