ETV Bharat / state

आजचा दिवस ऐतिहासिक, 'याची डोळा याची देह' हा क्षण बघायला मिळणं म्हणजे श्रीरामाचा आशीर्वाद आहे- देवेंद्र फडणवीस

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2024, 4:18 PM IST

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत सुरू असलेला रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेचा संपूर्ण नयनरम्य सोहळा नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात बसून बघितला. (Ram Mandir PranPratistha) त्यापूर्वी त्यांनी राम मंदिरात पूजाअर्चना केली. आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. गेली पाचशे वर्ष तमाम हिंदू बांधवांनी जो संघर्ष, त्याग केला त्याचं फलित आज मिळाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. (Politics)

see Ram Mandir PranPratistha
देवेंद्र फडणवीस

राम मंदिराविषयी भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर Devendra Fadnavis : आजचा सुवर्ण क्षण बघायला मिळावा यासाठी हजारो-लाखो लोकांचे बलिदान झाले. ज्याकरिता हा संघर्ष पेटला तो भारतीय अस्मितेचा संघर्ष होता. (Ram Temple) त्या राम मंदिराचं आज निर्माण होऊन त्या मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना (Maharashtra Politics) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केली जात असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. (Ram Mandir inauguration)

हे होते बाबरच्या सेनापतीचे मनसुबे : सन १५२८ साली बाबरचा सेनापती मीर बाकी यांनी रामाचं मंदिर तोडलं. भारतीयांच्या मनातून राम आणि कृष्ण काढणार नाही तोपर्यंत भारतीयांना गुलाम करता येणार नाही, अशी त्याची धारणा होती. म्हणून त्या ठिकाणचं राम मंदिर पाडून त्याने बाबरी ढाचा बांधला. मुळात ती मशिद नव्हती तर हिंदूंच्या छातीवर उभा केलेला एक ढाचा होता. जो हे सांगत होता की तुम्ही आमचे गुलाम आहात आणि तुमचे रामही तुम्हाला वाचवू शकणार नाही. साधुसंतांसह अनेक वीरांनी लढाई केली. १८ लढाया झाल्या. ज्यामध्ये अनेक लोक हुतात्मा झाले, तरीही संघर्ष सुरूच होता.


'त्या' देशाला भविष्य नसतं : स्वातंत्र्यानंतर विश्व हिंदू परिषदेने संकल्प केला की, ढाचा आपण खाली उतरवला नाही तर या स्वातंत्र्याचं मोल काय आहे. राजकीय स्वातंत्र्य मिळालं; मात्र सांस्कृतिक, अध्यात्मिक स्वातंत्र्यही तेवढच महत्त्वाचं आहे. देशाला सांस्कृतिक, आध्यात्मिक इतिहास माहीत नसतो, त्या देशाला वर्तमान असतो. मात्र, भविष्य नसते.


लाठी, गोळी खात कारसेवक अयोध्येत पोहचले : १९९० मध्ये जेव्हा पहिली कारसेवा झाली त्यावेळी मुलायम सिंहनी सांगितलं की, कुणीही या ठिकाणी येऊ शकत नाही. मी कुणाला येऊ पण देणार नाही; मात्र कारसेवकांना रोखण्याचा कुणातही दम नव्हता. 'लाठी, गोली खायेंगे मंदिर वही बनायेंगे' नारा देत कारसेवक त्या ठिकाणी पोहोचले. कोठारी बंधू हातात भगवा घेऊन वर चढले. छातीवर गोळी खाल्ली; मात्र जय श्रीराम म्हणत हातातील भगवा खाली येऊ दिला नाही.


मला याचा आनंद : मला या कारसेवेत सहभागी होता आलं याचा आनंद आहे. यासाठी मी जेलमध्ये देखील गेलो; मात्र आज त्या वेळचा संघर्ष, आज राम मंदिर होताना स्वप्नपूर्तीचा अनुभव पाहायला मिळतोय, असं फडणवीस यांनी सांगितलं.


हे तेचं लोक आहेत ज्यांनी रामाला नाकारलं : काही लोकं आज सांगतात की, आम्ही अयोध्येला जाणार नाही. मात्र, हे तेचं लोकं आहेत ज्यांनी न्यायालयात सांगितलं होतं की प्रभू श्रीराम हे काल्पनिक आहेत. रामाच्या जन्माचा कोणताही पुरावा नाही. काही सरकारांनी तर रामसेतूवरही प्रश्न उपस्थित केले आणि रामसेतूला तोडून येथून जहाज चालली तर व्यापार वाढेल असं सांगितलं.

मंदिर वही बनाएंगे, ही मोदी गॅरंटी : २०१४ मध्ये जेव्हा एका राम भक्ताच्या हातात देशाची सत्ता आली, एक वाघ जेव्हा देशाचा पंतप्रधान बनला तेव्हा सुप्रीम कोर्टात 'डंके की चोट पर' याचिका दाखल केली. याच ठिकाणी राम मंदिर होतं आणि ते मंदिर तोडलं गेलं. म्हणून आम्ही याच ठिकाणी पुन्हा मंदिर बनविणार हे ठामपणे सांगितलं. जेव्हा आमच्या समितीनं सगळ्या मंदिराचे अवशेष सुप्रीम कोर्टासमोर मांडले तेव्हा निर्णय आपल्या बाजूनं लागला, असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा:

  1. 'बडे मियाँ छोटे मियाँ' स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफनं श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी चाहत्यांना दिल्या शुभेच्छा
  2. राहुल गांधींना आसाममध्ये मंदिरात जाण्यापासून रोखलं, काय आहे कारण; वाचा सविस्तर
  3. अयोध्येपासून अमेरिकेपर्यंत 'जय श्रीराम'! भारतीयांकडून जगभरात 'असे' कार्यक्रम होणार साजरे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.