ETV Bharat / sports

सनरायझर्स हैदराबादचा संघ सहा वर्षानंतर अंतिम फेरीत  उगवला, २६ मे रोजी विजेते पदासाठी कोलकात्ताबरोबर भिडणार - SRH VS RR

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 5:30 PM IST

Updated : May 25, 2024, 7:01 AM IST

SRH VS RR Qualifier 2: आयपीएल २०२४ चा क्वालिफायर २ सामना चेन्नई येथे सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं ३६ धावांनी विजय मिळविला. या सामन्यातील विजयानंतर हैदराबाद अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सशी रविवारी भिडणार आहे.

SRH VS RR Qualifier 2
SRH VS RR Qualifier 2 (Desk)

चेन्नई SRH VS RR Qualifier 2: सहा वर्षानंतर सनरायझर्स हैदराबादनं (SRH) आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सनरायझर्सनं हैदराबादनं ३६ धावांना पराभव करत राजस्थान रॉयल्सच्या (RR) आयपीएलमधील विजयाच्या आशेची किरणे मावळून टाकली आहेत. सनरायझर्स हैदराबादचा आता कोलकाता नाईट रायडर्सबरोबर २६ मे रोजी विजेतपदासाठी सामना रंगणार आहे.

हैदराबादचा फिरकी गोलंदाज शाहबाज अहमद ३ विकेट्स ४ षटकात घेत २३ धावा दिल्या. आठव्या क्रमांकावर येऊनही त्यानं १८ धावा करत संघाच्या धावसंख्येत आणखी भर घातली. अष्टपैलु कामगिरीमुळे शाहबाजलाच सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं.

हैदराबादचे फिरकी गोलंदाज शाहबाज अहमद आणि अभिषेक शर्मा यांनी मधल्या षटकांमध्ये विकेट घेत राजस्थानची फलंदाजी खिळखिळी करून टाकली. त्यामुळे राजस्थानच्या संघाला शेवटपर्यंत फलंदाजीची बाजू सावरणं शक्य झालं नाही. धावाचं वाढत जाणारं लक्ष्य आणि चेंडुची कमी असलेल्या संख्या अशा कात्रीत सापडलेल्या राजस्थान रॉयल्सचा ३६ धावांनी पराभव झाला. अभिषेक शर्मानं २ बळी घेत हैदराबादला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामातील क्वालिफायर-2 सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील सामना जिंकून सहा वर्षानंतर हैदराबादचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. या सामन्यात हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 176 धावांचं लक्ष्य दिलं होतं. हैदराबादकडून हेनरिक क्लासेननं सर्वाधिक 50 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मानं प्रत्येकी तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनं 6 गड्यांच्या मोबदल्यात 90 हून अधिक धावा केल्या आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होत आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे. याच मैदानावर 26 मे रोजी अंतिम सामना होणार आहे.

हैदराबादच्या संघात मोठे बदल : या सामन्यासाठी राजस्थान रॉयल्सनं आपल्या संयोजनात कोणताही बदल केलेला नाही. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्कराम आणि वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट सनरायझर्स हैदराबादच्या प्लेइंग-11 मध्ये परतले. तर श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज विजयकांत व्यासकांत या सामन्यातून बाहेर राहिलाय.

हैदराबाद संघानं यावेळी विजेतेपद पटकावल्यास हा संघ इतिहास रचेल. आयपीएलच्या इतिहासातील हा दुसरा संघ ठरेल, ज्यानं क्वालिफायर-१ गमावूनही जेतेपद पटकावले आहे. याआधी आयपीएलच्या इतिहासात फक्त मुंबई इंडियन्सनं ही कामगिरी केलीय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं एकदा नव्हे तर दोनदा अशी कामगिरी केलीय. २०१३ आणि २०१७ मध्ये मुंबई संघ क्वालिफायर-१ मध्ये पराभूत झाल्यानंतर क्वालिफायर-२ जिंकून अंतिम सामन्यात विजय मिळवला होता.

  • २०१७ च्या मोसमातही मुंबई क्वालिफायर-१ गमावून चॅम्पियन बनली होती. त्यानंतर अंतिम फेरीत पुणे सुपरजायंट्सचा पराभव करून विजेतेपद पटकावलं होतं.
  • २०१३ च्या मोसमात मुंबई क्वालिफायर-१ गमावून चॅम्पियन बनली होती. त्यानंतर फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला हरवून विजेतेपद पटकावले होते.

पात्रता फेरीतील चॅम्पियन संघांचे विक्रम: क्वालिफायर आणि एलिमिनेटरची प्रणाली २०११ पासून सुरू झालीय. त्यानंतर फक्त मुंबई इंडियन्स क्वालिफायर-१ गमावून चॅम्पियन बनले आहेत. एलिमिनेटर खेळणारा संघ एकदाच चॅम्पियन झाला आहे. सनरायझर्स हैदराबादने २०१६ मध्ये ही कामगिरी केलीय.

यंदाच्या मोसमात संघांची कामगिरी: या मोसमात राजस्थान आणि हैदराबादच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली आहे. या आयपीएल हंगामातील पहिल्या ९ सामन्यांपैकी राजस्थाननं फक्त एकच सामना गमावला होता. त्यानंतर सर्व सामने हरले आहेत. मात्र, कोलकाताविरुद्धचा लीगमधील शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला. राजस्थानने १४ साखळी सामन्यांमध्ये ८ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर हैदराबादनंही चमकदार कामगिरी करत १४ पैकी ८ सामने जिंकले आहेत. रनरेटमुळं हैदराबादचा संघ टॉप-२ मध्ये पात्र ठरला होता.

सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन.

राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रायन पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

हेही वाचा

  1. आरसीबीच्या पराभवानंतर दिनेश कार्तिकची आयपीएलमधून निवृत्ती, जाणून घ्या त्याची कारकीर्द - Dinesh Karthik Retirement
  2. 'किंग' कोहलीने रचला नवा इतिहास; ठरला आयपीएलमध्ये ८००० धावा करणारा पहिला फलंदाज - Virat Kohli Record
Last Updated : May 25, 2024, 7:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.