ETV Bharat / spiritual

'या' राशीच्या व्यक्तींना मिळेल जोडीदाराकडून खास 'प्रॉमिस'; वाचा राशीभविष्य

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 5:10 AM IST

Today Horoscope
राशी भविष्य

Today Horoscope : कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 11 फेब्रुवारी 2024 चे राशी भविष्यात.

  • मेष : आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस मित्र आणि सामाजिक कार्ये यांच्यासाठी धावपळ करण्यात जाईल. पैसा सुद्धा खर्च होईल. नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे सफल होतील. मोठयांचा सहवास लाभेल, त्यांना भेटून आनंद होईल. दूर किंवा विदेशात असलेल्या संततीची काही आनंददायी बातमी मिळेल किंवा भेट होईल. अचानक धन लाभ संभवतो.
  • वृषभ : आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विशेषतः व्यापार - व्यवसाय करणार्यांना आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. कार्यालयात वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख शांती मिळेल. मित्र भेटीतून आनंद मिळेल.
  • मिथुन : आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आपणास मानसिक व्यग्रता आणि शारीरिक शिथिलता अनुभवास येईल. काम करायला उत्साह वाटणार नाही. नोकरीत वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही. पैसा खर्च होईल. संतती बरोबर मतभेद होतील किंवा त्यांच्या चिंतेत मन व्यग्र राहील. प्रतिस्पर्ध्यां पासून सावध राहावे लागेल.
  • कर्क : आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर आपण अस्वस्थ राहाल. रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांशी संघर्ष संभवतो. आज नवीन कामे सुरू करू नये. नवे परिचय सुद्धा लाभदायी होणार नाहीत. सरकार विरोधी कारवाई पासून दूरराहणे सुद्धा फायदेशीर ठरेल.
  • सिंह : आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज पति-पत्नीत मतभेद होऊन कटुता निर्माण होईल. दोघां पैकी एकाचे स्वास्थ्य बिघडणार नाही याकडं लक्ष द्यावं लागेल. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळं मन उदास राहील. सामाजिक क्षेत्रात अपयशी व्हाल. भागीदारांशी सुद्धा मतभेद होऊ शकतात. कोर्ट-कचेरीपासून शक्यतो दूरच राहा.
  • कन्या : आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज नोकरी-व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. कुटुंबातील वातावरण सुखावह असेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.
  • तूळ : आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आपली वैचारिक आणि मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल. त्यामुळं इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील. चर्चा-वादविवाद यात सुद्धा आपला प्रभाव राहील. कष्टाच्या मानाने यश संतोषजनक नसेल. कामात सांभाळूनच पुढे चला. आहाराकडं लक्ष द्या. अजीर्णाचा त्रास संभवतो. साहित्य, लेखन ह्यात गोडी निर्माण होईल.
  • वृश्चिक : आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज मित्रांशी सावधपणे वागावे लागेल. शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता राहील. आईचे स्वास्थ्य बिघडू शकते. धन आणि किर्तीची हानी होईल. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील. मन प्रसन्न नसल्यानं आज झोप सुद्धा होणार नाही.
  • धनू : आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपण प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आजचा दिवस नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल आहे. मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. आज आपल्या जीवनात आनंद ओसंडून वाहू लागेल. मित्र आणि स्नेही भेटल्यामुळं आनंदित व्हाल.
  • मकर : आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांशी गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग घडल्यानं मन दुःखी होईल. विनाकारण खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकाल. गृहिणी आज असंतुष्ट राहतील. शांती मिळण्यासाठी प्रयत्न करावं लागतील.
  • कुंभ : आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आपणास आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. मित्र आणि कुटुंबीय याच्यासह आनंदात दिवस घालवाल. प्रवास, सहल ह्यातून सुद्धा आज आनंद मिळवू शकता. आज विचारातील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा.
  • मीन : आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. स्थावर संपत्ती व कोर्ट - कचेरी ह्यांच्या पासून आज शक्यतो दूर राहा. मनाच्या एकाग्रतेमुळं सर्व कामात फायदा होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. स्वकीयांचा वियोग घडू शकतो. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. मिळणार्‍या फायदयात नुकसान होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिक देवाण-घेवाणीचे निर्णय विचार पूर्वक घ्या. अपघात आणि गैरसमज ह्यापासून दूरच राहा.

हेही वाचा -

  1. 'या' राशीच्या प्रेमीयुगुलांसाठी खास आहे 'टेडी-डे'; वाचा आजचं राशीभविष्य
  2. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.