ETV Bharat / spiritual

'या' राशीच्या प्रेमीयुगुलांसाठी खास आहे 'टेडी-डे'; वाचा आजचं राशीभविष्य

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 6:35 AM IST

Today Horoscope : कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 10 फेब्रुवारी 2024 चे राशी भविष्यात.

Today Horoscope
राशीभविष्य

मेष : आजच्या दिवशी मकर राशीचा चंद्र आपल्या दशमात असेल. आजचा दिवस थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास आणि प्रवास यासाठी उत्तम आहे. व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक आहे. घरात शुभ प्रसंगाचं नियोजन होईल. जुगार, शेअर्स यांत फायदा होईल. पत्नीच्या आरोग्या विषयी काळजी राहील.

वृषभ : आज मकर राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यवसायात नवीन विचार प्रणाली अंमलात आणाल. प्रकृतीकडं थोडं लक्ष द्यावं लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अचानकपणे एखाद्या संकटास सामोरे जावे लागेल. व्यापारात पैशाच्या देवाण- घेवाणीसाठी केलेला प्रवास लाभदायी ठरेल. नोकरीत बढती संभवते. संततीच्या प्रगतीमुळं मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

मिथुन : मकर राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज मनात नकारात्मक विचार येतील, जे दूर करावे लागतील. अपघात होण्याची शक्यता असल्यानं वाहन सावधपणे चालवावे. अचानकपणे खर्च वाढतील. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. दुपार नंतर वैचारिक घोळ निर्माण होईल. मन बेचैन होईल. संततीच्या समस्येमुळं काळजी वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार नाही याकडं लक्ष द्यावं लागेल.

कर्क : मकर राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. आज आपणास स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद, सुंदर वस्त्रालंकारांचा लाभ आणि भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभल्यानं आपण आनंदित व्हाल. आपली आर्थिक बाजू मजबूत होईल. मन मात्र भरकटत राहील. अकस्मात पैसा खर्च होईल. भागीदारांशी मतभेद वाढतील. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. नवीन कामे सुरू करताना अडचणी येतील.

सिंह : आजच्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आजचा दिवस व्यापार वृद्धी करण्यास अनुकूल आहे. व्यवसायातील आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. योग्य कारणांसाठी पैसा खर्च होईल. परदेशस्थ व्यावसायीकांमुळं लाभ संभवतात. धनवृद्धि संभवते. विचारात एकसुत्रीपणाचा अभाव जाणवेल, प्रवास होतील. अचानकपणे पैसा खर्च होईल. भागीदारांबरोबर मतभेद असले तरी परिस्थिती अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. नवीन कामात अडथळे येतील.

कन्या : आजच्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा असेल. आजचा दिवस सौख्यदायी आहे. अलंकार खरेदी करू शकाल. कलेत आवड निर्माण होईल. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक बाबी मार्गी लागतील. घरात आनंद आणि शांतता लाभेल. प्रकृती उत्तम राहील. व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकार्यांचे उत्तम सहकार्य लाभेल.

तूळ : आजच्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या चौथ्या असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. उत्साह आणि आनंद यांचा अभाव राहील. कौटुंबिक वातावरण तणावयुक्त राहील. नोकरी - व्यवसायात मानहानी होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आपल्यातील कलात्मकतेस वाव मिळेल.

वृश्चिक : आजच्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आज संपत्ती विषयक कामे आणि घरगुती प्रश्न याचं निराकरण होऊ शकेल. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. परंतु दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. नोकरी - व्यवसायात यशप्राप्ती होणे अवघड होईल. कुटुंबात एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. अवेळी खाणे पिणे होईल. निद्रानाश होण्याची शक्यता आहे. धनहानी संभवते.

धनू : मकर राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा असेल. आज आप्तांशी मतभेद संभवतात. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडं लक्ष द्यावं लागेल. दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. मनाची जी द्विधा स्थिती झाली होती, त्यात बदल होईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. हितशत्रूंवर मात करू शकाल.

मकर : आजच्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आज आपला कल धार्मिकतेकडे होईल. व्यापार - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल होईल. आपली सगळी कामे सहजपणे पूर्ण होतील. जीवनात आनंद वाढेल. मात्र, दुपार नंतर नकारात्मक विचार मनात येतील. त्यामुळं निराशा वाढेल. शेअर्स आणि सट्टयात गुंतवणूक करू शकाल.

कुंभ : आजच्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. आज धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. अपघात किंवा शस्त्रक्रियेची शक्यता आहे. दुपार नंतर सर्व काही सुरळीत पार पडेल. कार्यालयात आपलाच प्रभाव असेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नतीची शक्यता आहे.

मीन : आजच्या दिवशी मकर राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी उत्तम फलदायी आहे. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. प्रवास संभवतात. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. दुपार नंतर मात्र प्रत्येक काम जवाबदारीने करावे लागेल. व्यापार - व्यवसायावर सरकारी हस्तक्षेप वाढेल. कष्टाचे अपेक्षित फळ न मिळाल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  2. लव्ह बर्ड्ससाठी कसा असेल व्हॅलेंटाईन वीक? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.