ETV Bharat / politics

'इजा-बिजा-तिजा' सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करेल- विजय वडेट्टीवार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 8:13 PM IST

Vijay wadettiwar criticized State Government said that All the three leaders of Mahayuti will destroy Maharashtra
'इजा-बिजा-तिजा' सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करेल- विजय वडेट्टीवार

Vijay wadettiwar On State Government : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. तसंच 'इजा-बिजा-तिजा' सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करेल, असंही ते म्हणाले आहेत.

'इजा-बिजा-तिजा' सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करेल- विजय वडेट्टीवार

मुंबई Vijay wadettiwar On State Government : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेतील खेचून सत्तेत बसलेले सरकार निवडणुकीपूर्वी जोरदार वसुली करत असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. राज्याला महायुतीतील तिन्ही नेत्यांनी खड्ड्यात घातलं असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी (5 फेब्रुवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

इजा-बिजा-तिजा सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करेल : यावेळी बोलत असताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, "महाराष्ट्राला पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणून ओळख आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही ओळख बदलली आहे. ठोकेबाज महाराष्ट्र म्हणून ओळख निर्माण झाली. ठाण्यातील घटनेमुळं महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली झुकली आहे. गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोपांनी सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तींची गरिमा धुळीस मिळवली आहे. गुंडागिरीला राजश्रय मिळत आहे. सत्तेत बसलेल्यांची पोरं कष्टानं उभे झालेले नेत्यांना संपवायला निघाली का? असा प्रश्न उपस्थित होतो. पक्षात गुंडांची स्पेशल भरती या सरकारनं सुरू केलीय. तसंच इजा-बिजा-तिजा सरकार महाराष्ट्राला उद्ध्वस्त करेल", असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.


वसुलीबाज सरकार : पुढं ते म्हणाले की, "राज्यातील सरकारमधील कटक पक्षांमध्ये वसुलीसाठी जणू काही स्पर्धा लागली आहे. राज्य अभियंता संघटनेनं मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे. या सरकारमध्ये कंत्राटदार सुरक्षित नाहीय. महायुतीतील गुंड आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या वसुलीमुळं त्रस्त होऊन राज्यातील कंत्राटदारांना सरकारकडं संरक्षण मागण्याची वेळ येत आहे. अशा प्रकारची मागणी राज्यात पहिल्यांदा होत आहे. यामुळं राज्यात कायदा आणि सुवस्थेची काय परिस्थिती निर्माण झाली, हे लक्षात येतं. राज्यातील सरकार खोके सरकार असून आता कंत्राटदारांनवर खोके देण्याची वेळ आली आहे. खंडणी मागण्याची नवीन प्रथा महायुती सरकारनं राज्यात आणली आहे."



सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? : महायुती सरकारमधील राजाश्रय मिळालेले अधिकारी मस्तावलेले आहेत. ज्या राज्यात न्यायाधीशांना योग्य वागणूक दिली जात नाही, सामान्य नागरिकांना कशी वागणूक दिली जाईल? अशा मुजरा अधिकाऱ्यांचा लाड पुरवणाऱ्या सरकारचं डोके ठिकाणावर आहे का? असा खोचक सवाल वडेट्टीवार यांनी केला. तसंच यापूर्वी मी कोल्डवॉर सुरू असल्याचं म्हणालो होतो. आता कोल्डवॉरची जागा शस्त्रांनी घेतली आहे. त्याची मजल एकमेकांवर बाँम्ब फेकण्यापर्यंत जाईल, इतकी सत्तेची लालसा या सरकारमध्ये असल्याचा आरोपही त्यांनी केला.


...म्हणूनच पत्र व्यवहार केला असावा : 'वन नेशन वन इलेक्शन'ला मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे समर्थन असल्याबाबतचं पत्र केंद्र सरकारला पाठवलं आहे. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, "महाराष्ट्राची होती नव्हती ती इज्जत घालून टाकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भरवशावर ती पुन्हा वाचवू, म्हणून यासाठी त्यांनी पत्र व्यवहार केला असावा", असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

हेही वाचा -

  1. सरकारकडून प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचं खच्चीकरण सुरू; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
  2. "इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा?", भाजपा आमदाराच्या गोळीबारावरून विरोधक आक्रमक
  3. महायुती सरकारचा अँम्ब्युलन्स घोटाळा, 8 हजार कोटी कंत्राटदाराच्या घशात - वडेट्टीवार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.