ETV Bharat / state

कॅफे म्हैसूरच्या मालकाला 'खाकी'चा धाक दाखवून लुटलं, निवृत्त पोलिसही कटात सामील; नेमकं काय घडलं? - Mumbai Crime

Mumbai Crime News : माटुंग्यातील प्रसिद्ध 'कॅफे म्हैसूर' या हॉटेलच्या मालकाच्या घरी आपण मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी आहोत, असं सांगत 25 लाख रुपयांची लूट करण्यात आली. याप्रकरणी मुंबई पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागाच्या पोलीस चालकासह 6 जणांना अटक करण्यात आली.

robbery at house of famous mysore cafe owner in matunga retired cop involved in robbery what exactly happened
कॅफे म्हैसूरच्या मालकाला 25 लाखांचा गंडा (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 11:17 AM IST

मुंबई Mumbai Crime News : माटुंग्यातील प्रसिद्ध 'कॅफे म्हैसूर' या हॉटेलचे मालक नरेश नायक यांच्या सायन येथील घरावर दरोडा टाकून 25 लाख रुपयांची लूट करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (14 मे) उघडकीस आली. दरोडेखोरांनी आपण पोलीस असल्याचा बनाव करुन लोकसभा निवडणुकीसाठी असलेला पैसा घरात दडवून ठेवल्याचं म्हणत म्हैसूर कॅफे मालकाच्या घरातील 25 लाख रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला. याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असून धक्कादायक बाब म्हणजे यापैकी दोन जण पोलीस असल्याचं समोर आलंय.

आरोपींमध्ये पोलिसांचाही समावेश : सेवानिवृत्त पोलीस दिनकर साळवे आणि नागपाडा मोटार वाहन विभागातील पोलीस कर्मचारी बाबासाहेब भागवत यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. बाबासाहेब भागवत हा एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीवर वाहन चालक म्हणून काम करतो. तर तिसरा आरोपी सागर रेडेकर (वय 42) हा खासगी चालक आहे. चौथा आरोपी वसंत नाईक (वय 52) हा कॅफे म्हैसूर या हॉटेलचा माजी व्यवस्थापक आहे. तर आरोपी श्याम गायकवाड (वय 52) हा इस्टेट एजंट असून आरोपी मिरज खंडागळे (वय 35) अशी अटक आरोपींची नावं आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण? : तक्रारदार नरेश नायक हे आपल्या आईसोबत सायन जंक्शन येथे राहतात. सोमवारी दुपारी 6 जण त्यांच्या घरी आले. त्यांनी आम्ही मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी आहोत अशी बतावणी केली. त्यातील दोघांनी मुंबई पोलिसांचं ओळखपत्रही दाखवलं. "आम्ही निवडणूक ड्युटीवर असून तुमच्या घरात निवडणुकीसाठी लागणारी मोठी रक्कम 17 कोटी असल्याची माहिती आम्हाला मिळाली, असं सांगून 6 जणांपैकी चौघांनी घराची झडती घेतली. तसंच कपाटातील 25 लाख रुपयांची रोकड बाहेर काढली. नरेश नायक यांनी ही रोकड हॉटेल व्यवसायातील असल्याचं सांगितलं. तरीही त्यांनी नरेश नायक यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन प्रकरण मिटविण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली.

सात दिवसांची पोलीस कोठडी : नायक यांनी एवढी रक्कम माझ्याकडं नाही असं सांगताच आरोपींनी 25 लाख रुपयांची रोकड घेऊन तेथून पोबारा केला. त्यानंतर पोलिसांनी आणि फॉरेन्सिक तज्ञांनी घटनास्थळी भेट देत नायक यांच्या घराची सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी या गुन्ह्यात काही पोलिसांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी पुरावे समोर आले. त्यानंतर रात्री उशिरा सायन पोलिसांनी सेवानिवृत्त पोलीस आणि कार्यरत पोलीस कर्मचारी या दोघांना अटक केली. त्यानंतर अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार इतर चार आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलं. तसंच हा गुन्हा करणाऱ्या 6 जणांनी पोलिसांच्या वाहनाचा वापर केल्याचंही पोलीस तपासात उघड झालं. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. बलात्काराचा गुन्हा असलेला भावेश भिंडे महाराष्ट्रा बाहेर पळाला, मुंबई पोलिसांची सात पथके शोधण्यासाठी रवाना - Ghatkopar Hoarding Accident
  2. मुंबईत पाच कोटींच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचे भर रस्त्यातून अपहरण; तिघांना अटक - Mumbai
  3. ६२ वर्षीय वृद्धाला लुटणाऱ्या आरोपीला बेड्या, पाच गुन्ह्यांची झाली उकल - Mumbai Crime News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.