ETV Bharat / politics

राजकारणातील चाणक्यानं फेकला शेवटचा पत्ता, धैर्यशील मोहिते पाटील 13 एप्रिलला शरद पवार गटात करणार प्रवेश - loksabha election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 2:12 PM IST

महायुतीमध्ये माढा लोकसभेच्या उमेदवारावरून असलेली मोहिते पाटलांची नाराजी असताना राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी मोठी चाल खेळली आहे. माढामधील तिकीट वाटपावरून महायुतीमध्ये नाराजी असताना भाजपाचे नेते धैर्यशील पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महायुतीला मोठा झटका मानला जात आहे.

BJP leader Dhairyasheel Mohite Patil
BJP leader Dhairyasheel Mohite Patil

पुणे: भाजपाचे नेते धैर्यशील मोहिते हे महायुतीकडून माढा लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. पण भाजपानं विद्यमान खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं फलटण आणि माढा या दोन ठिकाणी मोठी नाराजी पसरली आहे. त्यामुळे मोहिते पाटील आणि निंबाळकर घराण्यानं बैठकी सुद्धा घेतल्या. पण प्रवेश हा कुठे घ्यायचा यासाठी ते कार्यकर्त्यांशी बातचीत करत होते. अखेर धैर्यशील मोहिते हे 13 एप्रिलला शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

माढामधील तिकीट वाटपावरून महायुतीमधील मोहिते पाटील घराणं आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील निंबाळकर घराणे नाराज आहेत. तिढा सुटला नसताना आपल्याला संधी नाही तर आपण तुतारी हातात घ्यावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्यास धैर्यशील मोहिते पाटीलसुद्धा म्हणत होते. परंतु विजयसिंह मोहिते पाटलांचे बंधू पुत्र रणजीत मोहिते पाटील विधानपरिषद सदस्य म्हणून भाजपामध्ये आहेत. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांना निर्णय घेण्यास वेळ लागल्याचं सूत्रानं सांगितलं.


अगोदर पक्षप्रवेश नंतर तिकीट?माढा लोकसभेची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली नव्हती. वेट अँड वॉची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आली होती. परंतु धैर्यशील मोहिते यांचा पक्ष प्रवेश निश्चित झालेला आहे. त्यांना माढा येथून उमेदवारीसुद्धा मिळू शकते. त्याचबरोबर आता निंबाळकर घराणं काय भूमिका घेतं? गणपत देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख काय भूमिका घेतात? या सगळ्याचीसुद्धा आता चाचणी केली जात आहे. काही दिवसापूर्वीच शरद पवार यांनी सांगितलं होतं की, आम्ही निंबाळकर आणि मोहिते या दोघांना आपसात बसून कुणाला उमेदवारी द्यायचे हे ठरवा. अगोदर पक्ष प्रवेश करूनच उमेदवारी द्यायची, यावर शरद पवार ठाम होते. त्यामुळे शरद पवारांनी माढा मतदारसंघाचे तिकीट वाटप न करण्याचं खरं कारण समोर आले आहे.


अखेरपर्यंत मार्ग काढण्याचे फडणवीस यांचे प्रयत्न- पश्चिम महाराष्ट्रातील मोठी मोहिते पाटील आणि निंबाळकर हे वजनदार घराणे आहेत. त्यांचे मोठ्या प्रमाणात सोलापूर आणि माढामध्ये वर्चस्व आहे. त्याचा फायदा शरद पवार यांच्या पक्षालासुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नाराजीवर मार्ग काढण्याचा देवेंद्र फडवणीस अखेरपर्यंत मार्ग काढत होते. मात्र, त्यांना यश आलं नसल्याचं दिसत आहे. धैर्यशील मोहिते पाटील अकलुजमधील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटांकडून कार्यकर्त्यांनासुद्धा सोलापूरमध्ये येण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करत असताना मोहिते पाटलातील कोणते नेते आणि पदाधिकारी या मंचावर उपस्थित राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा-

  1. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, 'या' दोन जागांवर उमेदवार घोषित, एका जागेचा तिढा कायम - NCP SCP Candidate List
  2. 'आदरानं गप बसलो म्हणून वळवळ करू नका; मी तोंड उघडलं तर फिरणं मुश्किल होईल,' अजित पवारांचा हल्लाबोल - Ajit Pawar vs Sharad Pawar
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.