पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि पत्नी बुशरा यांना 7 वर्षांची शिक्षा; वाचा काय आहे प्रकरण?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 9:23 PM IST

इम्रान खान

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. लग्नादरम्यान इस्लामिक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयानं दोघांना दोषी ठरवलंय. बुशराच्या पहिल्या पतीच्या याचिकेवर न्यायालयानं हा आदेश दिलाय.

इस्लामाबाद Imran Khan : पाकिस्तानच्या एका न्यायालयानं आज माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय. गैर-इस्लामिक लग्न केल्याप्रकरणी न्यायालयानं दोघांनाही सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. इम्रान खानच्या पत्नीचे पहिले पती खावर मनेका यांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला होता. दोन लग्नांमधील अनिवार्य वेळ पाळण्याच्या इस्लामिक प्रथेचं उल्लंघन केल्याचा आरोप मनेकांनी केला होता.

इम्रान खानला 2022 नंतर चौथ्यांदा कोर्टाकडून शिक्षा : बुशराच्या माजी पतीनं इस्लामिक प्रथेचं उल्लंघन केल्यामुळं त्यांच्या लग्नावर प्रश्न उपस्थित केले होते. याप्रकरणी कोर्टानं प्रदीर्घ उलटतपासणीनंतर आरोप खरे ठरवत इम्रान आणि बुशराला दोषी ठरवलंय. तसंच न्यायालयानं इम्रान आणि बुशरा यांना आर्थिक दंडही ठोठावलाय. उल्लेखनीय बाब म्हणजे 71 वर्षीय इम्रान खान यांना 2022 नंतर चौथ्यांदा शिक्षा झालीय. याच आठवड्यात इम्रा यांना गोपनीय राजनयिक दस्तऐवज प्रकरणात 10 वर्षांचा तुरुंगवास आणि तोशाखाना प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी न्यायालयाचा हा निर्णय इम्रान खान यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय.

14 तास चालली सुनावणी : आज रावळपिंडी येथील अदियाला जेल कॉम्प्लेक्समध्ये 14 तास चाललेल्या सुनावणीनंतर हा निकाल आलाय. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश कुदरतुल्ला यांच्या न्यायालयानं इम्रान आणि बुशरा यांना 5 लाखांचा दंडही ठोठावलाय. कोर्टाच्या निर्णयानुसार इम्रान आणि बुशरा कोर्ट रुममध्ये उपस्थित राहिले. या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर इम्रान खान म्हणाले की, "त्यांचा आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना अपमानित करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध हा खटला दाखल करण्यात आलाय."

मागील अनेक दिवसांपासून इम्रान खान तुरुंगात : गेल्या वर्षी 5 ऑगस्टला अटक केल्यानंतर इम्रान खान यांना पाकिस्तान निवडणूक आयोगानं दाखल केलेल्या तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी घोषित केलं होतं. तेव्हापासून इम्रान तुरुंगात आहेत.

हेही वाचा :

  1. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
  2. Cricket World Cup 2023 : असाही दुर्विलास! एकेकाळच्या विश्वविजेता कर्णधाराला सामना पाहण्यासाठी घ्यावी लागेल तुरुंग अधिकाऱ्यांची परवानगी
  3. Imran Khan : इम्रान खान यांना तीन वर्षांचा कारावास, लाहोरमधून अटक, ५ वर्ष निवडणूकही नाही लढता येणार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.