ETV Bharat / entertainment

‘टू किल अ टायगर’ भारतीय कलाकृतीला 'ऑस्कर'ची हुलकावणी, प्रियांका चोप्राचं चित्रपटाशी खास आहे  कनेक्शन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 11, 2024, 11:16 AM IST

Updated : Mar 11, 2024, 11:46 AM IST

Oscar 2024
ऑस्कर 2024

Oscar 2024: लॉस एंजेलिस (अमेरिका) येथील डॉल्बी थिएटरमध्ये झालेल्या 'ऑस्कर 2024' सोहळ्यात प्रियांका चोप्राच्या ‘टू किल अ टायगर’ डॉक्युमेंट्रीला पुरस्कार मिळाला नाही. या पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहायमर' चित्रपटानं बाजी मारली आहे.

लॉस एंजेलिस - Oscar 2024: 96 व्या ऑस्कर पुरस्कार 2024 ची आज 11 मार्च रोजी भव्य सांगता झाली. लॉस एंजेलिस (अमेरिका) येथील डॉल्बी थिएटरमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात 23 श्रेणींमध्ये पुरस्कारांचे वितरण करण्यात आलं होते. त्याचबरोबर 'ऑस्कर 2024' मध्ये 13 श्रेणींमध्ये निवडलेल्या 'ओपनहायमर' या चित्रपटानं सर्वाधिक ऑस्कर जिंकले आहेत. प्रियांका चोप्रा आणि निशा पाहुजाची डॉक्युमेंट्री 'टू किल अ टायगर' या एकमेव भारतीय कलाकृतीला यंदा ऑस्करमध्ये नामांकन मिळालं होतं. ही डॉक्युमेंट्री झारखंडमधील एका छोट्या गावात शूट करण्यात आली होती. या कलाकृतीकडून चित्रपट अभ्यासकांना खूप अपेक्षा होत्या. पण 'टू किल द टायगर'ला आपली मोहर 'ऑस्कर' वर कोरता आली नाही. प्रियांका ही या चित्रपटाची सहनिर्माती आहे.

‘टू किल अ टायगर’ चित्रपटाची कहाणी : ‘टू किल अ टायगर’ या डॉक्युमेंट्री फीचर फिल्मच्या कहाणीबद्दल बोलायचं झालं तर 13 वर्षांच्या निष्पाप मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर एक वडील न्याय मिळविण्यासाठी किती संघर्ष करतो, याचं ह्रदयद्रावक वास्तव चित्रण या डॉक्युमेंट्रीमध्ये पाहायला मिळतं. तसंच वडिलांचा समाजाबरोबर लढा या फिल्ममध्ये दाखवण्यात आला आहे. ‘टू किल अ टायगर’ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फीचर श्रेणीमध्ये ऑस्करसाठी नामांकन मिळण्याच्या एक दिवस आधी हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला होता. आता ही डॉक्युमेंट्री फीचर फिल्म तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'ओपनहायमर'न मारली बाजी : क्रिस्टोफर नोलन दिग्दर्शित 'ओपनहायमर'नं एकूण 13 श्रेणींमध्ये नामांकन मिळवलं होत. या चित्रपटानं सर्वाधिक 7 'ऑस्कर' जिंकले आहेत. यामध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा 'ऑस्कर' पुरस्कार मिळाला आहे. रॉबर्ट डाउनी ज्युनियर यांना 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' किलियन मर्फी आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी ऑस्कर मिळाला आहे. लुडविग गोरेसेन यांना ओरिजिनल स्कोरसाठी ऑस्कर मिळाला आहे. सिनेमॅटोग्राफीसाठी 'हेटे व्हॅन हॉयटेमा' आणि चित्रपटाच्या एडिटिंगसाठी जेनिफर लॅम यांना 'ऑस्कर' पुरस्कार दिला गेला आहे.

हेही वाचा :

  1. कलादिग्दर्शक नितीन देसाईंना ऑस्कर सोहळ्यात 'इन मेमोरिअम'मध्ये आदरांजली
  2. Oscars 2024 Winners List : ओपेनहाइमरनं पटकाविले सात पुरस्कार, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
  3. Oscars 2024 : सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार देताना जॉन सीना पोहोचला मंचावर, 'त्या' कृतीनं झाला एकच हास्यकल्लोळ
Last Updated :Mar 11, 2024, 11:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.