ETV Bharat / entertainment

'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या एका दिवसाच्या स्टंटचा खर्च होता 3-4 कोटी, दिग्दर्शकानं केला खुलासा - Bade Miyan Chote Miyan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 10:07 AM IST

Bade Miyan Chote Miyan
बडे मियाँ छोटे मियाँ

Bade Miyan Chote Miyan : 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटामधील करोडो रुपये खर्चून स्टंट सीन शूट करण्यात आले आहेत. याबद्दल आता दिग्दर्शक अली अब्बास जफरनं खुलासा केला आहे.

मुंबई -Bade Miyan Chote Miyan : हिंदी चित्रपटसृष्टीचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' रिलीज होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर चित्रपटामध्ये जबरदस्त ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ व्यतिरिक्त मानुषी छिल्लर, आलिया इब्राहिम, सोनाक्षी सिन्हा, पृथ्वीराज सुकुमारन, जान्हवी कपूर, जुगल हंसराज आणि इतर कलाकार दिसणार आहेत. दरम्यान 'बडे मियाँ छोटे मियाँ'चे ॲक्शन सीन काल्पनिक न राहता खरे वाटण्यासाठी निर्मात्यांनी खूप मेहनत घेतली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटामधील स्टंटवर झाला खूप खर्च : 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या स्टंट सीन्सवर बराच खर्च करण्यात आला आहे. प्रत्येक स्टंटवर बारकाईनं काम केलं गेलं आहे. अली अब्बास जफरनं या चित्रपटाबद्दल सांगताना म्हटलं, ''चित्रपटाच्या स्टंट सीन्सवर करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. चित्रपट निर्मात्यांवर नेहमीच बजेटबद्दल मोठा दबाव असतो. जेव्हा तुम्हाला काही तरी चांगलं दाखवायचं आहे, त्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. तुम्हाला छोटा जरी स्टंट करायचा असे तर 4 लाख रुपये खर्च करावे लागतात. स्टंट चुकला तर चार लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते. असे अनेक स्टंट्स आहेत, ज्याची किंमत 3-4 कोटी रुपये होती. त्यात वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंच्या किंमती खूप महाग होत्या. ''

'बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटाबद्दल : 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाला यूए प्रमाणपत्र मिळाले आहे. म्हणजे 12 वर्षावरील कोणत्याही वयोगटातील लोक हा चित्रपट पाहू शकतात. 12 वर्षाखालील मुले मात्र पालकांसोबतच चित्रपट पाहू शकतात. या चित्रपटाचा रनटाईम हा 2 तास 44 मिनिटांचा आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' 10 एप्रिल रोजी म्हणजेच ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची टक्कर बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या 'मैदान'शी होणार आहे. दरम्यान या चित्रपटाची निर्मिती अली अब्बास जफर, जॅकी भगनानी, वाशु भगनानी, दीपशिखा देशमुख आणि हिमांशू किशन मेहरा यांनी पूजा एन्टरटेन्मेंट आणि एएझेड फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे.

हेही वाचा :

  1. 'पुष्पा 2' मधील रश्मिका मंदान्नाचा 'श्रीवल्ली लूक' लॉन्च, निर्मात्यांनी चाहत्यांनी दिलं बर्थडे गिफ्ट - Srivalli first look
  2. दिशा पटानीनं शेअर केले इटलीतील 'कल्की 2898 AD' च्या शूटिंगचे प्रभास बरोबरचे फोटो - Disha Patani Photo
  3. रश्मिका मंदान्नाचे सर्वोच्च सुपरहिट 10 चित्रपट, 'अ‍ॅनिमल' आणि 'गीता गोविंदम'ही नाहीत शीर्षस्थानी - Rashmika Mandanna Birthday
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.