ETV Bharat / entertainment

रश्मिका मंदान्नाचे सर्वोच्च सुपरहिट 10 चित्रपट, 'अ‍ॅनिमल' आणि 'गीता गोविंदम'ही नाहीत शीर्षस्थानी - Rashmika Mandanna Birthday

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 5, 2024, 1:39 PM IST

Rashmika Mandanna Birthday: अष्टपैलू अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिनं आपल्या सहज सुंदर नैसर्गिक अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आज तिचा वाढदिवस साजरा करत असताना, रुपेरी पडद्यावर तिच्या गाजलेल्या भूमिकांवर एक नजर टाकणार आहोत. तिच्या सर्वोच्च 10 IMDb रेटिंग मिळालेल्या चित्रपटांची यादी पाहूयात.

Rashmika Mandanna Birthday
रश्मिका मंदान्नाचे सर्वोच्च सुपरहिट 10 चित्रपट

मुंबई - Rashmika Mandanna Birthday: रश्मिका मंदान्ना आज शुक्रवारी 5 एप्रिल रोजी आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं तिच्या चित्रपट कारकिर्दीचा आढावा घेण्याची उत्तम संधी आली आहे. आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर ती भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त मागणी असलेली अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली आहे. 2016 मध्ये पदार्पण केल्यापासून तिनं आपल्या प्रतिभेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

रश्मिकानं 2016 मध्ये 'किरिक पार्टी' या चित्रपटातून कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तिच्या मोहून टाकणाऱ्या अभिनयामुळे तिला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि तिच्या भविष्यातील यशाचा मार्ग मोकळा झाला. तेव्हापासून ती तामिळ आणि तेलुगु या दोन्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करून तिच्या प्रतिभेची चुणूक दाखवत आली आहे.

रश्मिकानं 'डिअर कॉम्रेड' आणि 'गीता गोविंदम' सारख्या चित्रपटात वास्तववादी व्यक्तीरेखा साकारत अभिनयाच्या जगतात स्वत: साठी एक स्थान निर्माण केलं. तिला केवळ प्रेक्षकांनीच नाही तर समीक्षकांनीही नावाजले आणि प्रशंसा केली. या चित्रपटांमुळे तिला स्टारडमपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून तिला मिळालेल्या प्रत्येक पात्रात ती परकाया प्रवेश केल्या प्रमाणे वास्तववादी अभिनय करताना दिसली. आज रश्मिका मंदान्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिच्या सर्वोच्च 10 टॉप रेटेड IMDb चित्रपटांसह तिच्या अभिनय कारकिर्दीवर एक नजर टाकूया.

1. किरिक पार्टी (2016) - IMDb रेटिंग: 8.2

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'किरिक पार्टी' हा रश्मिकाचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि यातील रंजक कथानक आणि यातील व्यक्तीरेखेसाठी समीक्षकांकडून प्रशंसा मिळवली. IMDb वर 10,000 पेक्षा अधिक मतं मिळवून या चित्रपटानं रश्मिकाच्या फिल्म इंडस्ट्रीतील करिअरचा मार्ग मोकळा झाला.

2. गीता गोविंदम (2018) - IMDb रेटिंग: 7.7

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

विजय देवरकोंडा बरोबर रश्मिका मंदान्नाची भूमिका असलेल्या या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचं सर्वत्र कौतुक झालं. समीक्षकांनी तिच्या अभिनयाला दाद दिली आणि तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. IMDb वर 16,000 हून अधिक मतं मिळाली, त्यामुळे 'गीता गोविंदम'मध्ये ती किती लोकप्रिय अभिनेत्री होती याचा हा सबळ पुरावा होता.

3. चमक (2017) - IMDb रेटिंग: 7.5

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

रश्मिका या कन्नड भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपटामध्ये अभिनेता गणेश बरोबर दिसली होती. उत्तम अभिनय आणि फ्रेश कथानकाची प्रेक्षकांना भुरळ पडली. IMDb वर 1,200 पेक्षा जास्त मतांसह तिच्यामध्ये रुपेरी पडदा चमकवण्याची क्षमता असल्याचं दाखवून रश्मिकानं दाखवून दिलं.

4. डियर कॉम्रेड (2019) - IMDb रेटिंग: 7.3

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

रश्मिकानं या रोमान्स ड्रामा चित्रपात आपल्या अभिनयासह विजय देवरकोंडा बरोबर बाजी मारली. प्रेम, समर्पणाची भावना आणि समाज या विषयावरील या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. IMDb वर 11,000 हून अधिक मते मिळवून डियर कॉम्रेड हा रश्मिकाचा सर्वात आवडता चित्रपट बनला.

5. सरिलेरू नीकेव्वारू (2020) - IMDb रेटिंग: 6.9

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

महेश बाबू बरोबर काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्या संधीच रश्मिकानं सोनं केलं. या अ‍ॅक्शन पॅक्ड ब्लॉकबस्टर चित्रपटामध्ये रश्मिका प्रेक्षक आणि समीक्षकांना तिच्या उत्कृष्ट अभिनय कामगिरीने प्रभावित करू शकली.IMDb वर 6,000 हून अधिक मतं मिळविणारा 'सरिलेरू नीकेव्वारू' हा चित्रपट रश्मिकाला लोकप्रियता बहाल करणारा ठरला.

6. अंजनी पुत्र (2017) - IMDb रेटिंग: 6.8

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

रश्मिकाने या कन्नड अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटामध्ये एका सुंदर मुलीची भूमिका साकारली. कन्नड सुपरस्टार पुनित राजकुमार यांच्या बरोबर रश्मिकानं स्क्रिन शेअर केली होती. यातील तिची भूमिका मोठी नसली तरी तिचा अभिनय संस्मरणीय ठरला. IMDb वर 1,500 हून अधिक मते मिळालेला अंजनी पुत्र हा चित्रपटानं रश्मिकाच्या फिल्मोग्राफीमध्ये एक महत्त्वाचा भर घातली आहे.

7. भीष्मा (2020) - IMDb रेटिंग: 6.6

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट काही अंशी यशस्वी झाला त्याचं महत्त्वाचं कारण होतं रश्मिकाची नीतीन बरोबर जुळून आलेली केमिस्ट्री. स्वतंत्र भावना असलेल्या मुलीची भूमिका तिनं खुबीनं साकारली होती. IMDb वर 2,500 हून अधिक मते मिळालेल्या भीष्मा चित्रपटानं रश्मिकाच्या प्रेक्षकांमधील लोकप्रियतेत भर घातली.

8. देवदास (2018) - IMDb रेटिंग: 6.6

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अभिनेता नानी आणि नागार्जुन यांच्या बरोबर या रोमांचक चित्रपटामध्ये विचित्र घटनांच्या जाळ्यात अडकलेली डॉक्टर म्हणून रश्मिकानं आपल्या अभिनयाची कायमची छाप पाडली. 'देवदास' चित्रपटाला IMDb वर 2,000 पेक्षा जास्त मते मिळाली आहेत. यातून एक अभिनेत्री म्हणून रश्मिकाची श्रेणी हायलाइट होताना दिसते.

9. पोगारू (2021) - IMDb रेटिंग: 6.4

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या कन्नड अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटामधील राकट आणि उग्र व्यक्तिरेखेसाठी चाहत्यांनी रश्मिकाचे कौतुक केलं. पोगारू चित्रपटाला IMDb वर 1,000 पेक्षा जास्त मते मिळाली आहेत, यातून विविध भूमिकांमध्ये रश्मिका सहज वावरते याचं दर्शन घडलं.

10. यजमान (2019) - IMDb रेटिंग: 6.4

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या कन्नड अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटामध्ये अभिनेता दर्शन मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट रश्मिकाच्या उपस्थितीमुळे अधिक मोहक बनला. IMDb वर 1,200 हून अधिक मते मिळालेल्या 'यजमान' चित्रपटाने रश्मिकाच्या प्रत्येक चित्रपटात प्रभाव पाडण्याच्या क्षमतेची जाणीव करुन दिली.

हेही वाचा -

अल्लू अर्जुननं 'पुष्पा: द रुल'च्या म्यूझिक रेकॉर्डिंग स्टुडिओतील संगीतकार आणि दिग्दर्शकाबरोबरचा फोटो केला शेअर - Pushpa The Rule

पृथ्वीराज सुकुमारन स्टारर 'द गोट लाईफ' ऑस्कर पुरस्कार मिळवू शकेल, इस्त्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना विश्वास - Prithviraj Sukumaran

चित्रपटांप्रमाणेच राजकारणसुद्धा 'वेट अन्ड वॉच'चा गेम, सई ताम्हणकरचे साई दर्शनानंतर उद्गार - Sai Tamhankar visit Sai Mandir

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.