ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुननं 'पुष्पा: द रुल'च्या म्यूझिक रेकॉर्डिंग स्टुडिओतील संगीतकार आणि दिग्दर्शकाबरोबरचा फोटो केला शेअर - Pushpa The Rule

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 5, 2024, 11:51 AM IST

Pushpa The Rule : 'पुष्पा: द रुल'ची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी अल्लु अर्जुन नेहमी चित्रपटाबद्दलची अपडेट देत असतो. 8 एप्रिल रोजी त्याच्या वाढदिवशी 'पुष्पा 2' चा टीझर रिलीज होणार आहे. दरम्यान संगीतकार द्वी श्री प्रसाद याच्या स्टुडिओत त्यानं दिग्दर्शक सुकुमारबरोबर फोटो सेशन केलं आहे.

Allu Arjun
अल्लू अर्जुन 'पुष्पा: द रुल'

मुंबई - Pushpa The Rule : 'पुष्पा: द रुल'बद्दलची उत्सुकता ताणलेली असताना चित्रपटाचे प्रत्येक अपडेट्स चाहते ठेवताना दिसतात. चाहत्यांमधील उत्साह जारी ठेवण्यासाठी अल्लु अर्जुननं 'पुष्पा 2' चे दिग्दर्शक सुकुमार आणि संगीत दिग्दर्शक देवी श्री प्रसाद यांच्याबरोबर म्यूझिक रेकॉर्डिंग करत असतानाचा एक फोटो शेअर केला आहे.

गुरुवारी इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये अल्लु अर्जुननं चाहत्यांसाठी काही नवीन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत देवी श्री प्रसाद यांच्या रेकॉर्डिंग स्टुडिओची झलक दिसत आहे. रॉकस्टार स्टुडिओमध्ये आजवर मिळालेल्या अनेक पुरस्कारांची मांडणी केल्याचं या फोटोत दिसतंय. दुसऱ्या फोटोत अल्लु अर्जुन संगीतकार देवी श्री प्रसाद आणि दिग्दर्शक सुकुमार यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण पोजमध्ये कॅमेऱ्याला लूक देत आहे. या फोटोला त्यानं 'द रुल' असं शीर्षक दिलंय.

'पुष्पा' चित्रपटाची नायिका रश्मिका मंदान्नाचा आज 5 एप्रिल रोजी 28 वा वाढदिवस आहे. ती आपला वाढदिवस यूएईमध्ये साजरा करत आहे. ती अल्लु अर्जुन आणि सहकाऱ्यांबरोबर म्यूझिक स्टुडिओत हजर नसली तरी अल्लुचा हा फोटो तिनं तिच्या इनस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिलं की, "अय्या, थोर मुलं काहीतरी आयकॉनिक तयार करत आहेत"

अल्लू अर्जुन 8 एप्रिल रोजी 42 वा वाढदिवस साजरा करणार आहे. यानिमित्तानं 'पुष्पा 2' चा टीझर लॉन्च करण्याची जय्यत तयारी निर्मात्यांनी केली आहे. मंगळवारी, चित्रपटाच्या टीमनं टीझरच्या रिलीजची तारीख जाहीर केली आणि एक नवीन पोस्टरही शेअर केलंय. चित्रपटाच्या अधिकृत एक्सवरील पोस्टमध्ये पोस्टर शेअर केले आणि त्यावर कॅप्शन लिहिले, "तो डबल द फायर घेऊन येत आहे. पुष्पा 2 द रुलचा टीझर 8 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे."

'पुष्पा: द रुल' हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मैत्री मुव्हीज मेकर्स निर्मित आणि सुकुमार दिग्दर्शित, या चित्रपटात फहद फासिल आणि रश्मिका मंदान्ना यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. पहिल्या भागातल्या उत्कृष्ट अभिनयासाठी अल्लू अर्जुनला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. ऑगस्ट 2023 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर त्यानं सोशल मीडियावर कृतज्ञता व्यक्त केली होती.

हेही वाचा -

  1. पृथ्वीराज सुकुमारन स्टारर 'द गोट लाईफ' ऑस्कर पुरस्कार मिळवू शकेल, इस्त्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना विश्वास - Prithviraj Sukumaran
  2. 'वाळवी' च्या प्रचंड यशानंतर परेश मोकाशी घेऊन येताहेत ‘नाच गं घुमा’! - Paresh Mokashi Movie
  3. 'मी जिंवत असेपर्यत श्रीदेवीचा बायोपिक बनू देणार नाही', बोनी कपूरचा निर्धार - SRIDEVI BIOPIC
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.