ETV Bharat / entertainment

'मी जिंवत असेपर्यत श्रीदेवीचा बायोपिक बनू देणार नाही', बोनी कपूरचा निर्धार - SRIDEVI BIOPIC

Sridevi Biopic : श्रीदेवीचे पती आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी आपण जिवंत असेपर्यंत श्रीदेवीचा बायोपिक बनू देणार नसल्याचं एका मुलाखतीत म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी या मुलाखतीदरम्यान एक खास खुलासा केला आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 1:15 PM IST

Updated : Apr 4, 2024, 3:00 PM IST

Sridevi Biopic
श्रीदेवीचा बायोपिक

मुंबई - Sridevi Biopic : हिंदी चित्रपटसृष्टीची प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यात नसली तरी ती चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. श्रीदेवीचे चित्रपट आणि तिची बबली शैली ही अनेकांना आवडत होती. तिला हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली लेडी सुपरस्टार मानली जाते. दरम्यान श्रीदेवीच्या बायोपिकची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. श्रीदेवीचे पती निर्माते बोनी कपूर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांपासून बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे. आता श्रीदेवीच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी पडद्यावर दाखवण्याचं अनेकांचं म्हणणे आहे. मात्र बोनी कपूर यांनी श्रीदेवीच्या जीवनावर आधारित चित्रपट होऊ देणार नाही असल्याचं म्हटलं आहे.

बोनी कपूरनं श्रीदेवीच्या बायोपिकवर मौन सोडलं : नुकत्याच एका मुलाखतीत सलमान खान आणि अर्जुन कपूरनं श्रीदेवीच्या बायोपिकवर काही खुलासे केले होते. आता यानंतर बोनी कपूरनं बायोपिकवर मौन सोडलं आहे. बोनी यांना एक मुलाखतीत श्रीदेवीच्या बायोपिकबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, ''श्रीदेवी ही आपले आयुष्य खासगी ठेवत होती. यामुळे कोणाच्या वैयक्तिक आयुष्याची प्रतिमा पडद्यावर दाखवणं हे योग्य नाही. मी जिवंत असतपर्यत बायोपिक होऊ देणार नाही." दरम्यान बोनी कपूरचा 'मैदान' हा चित्रपट 10 एप्रिलला प्रदर्शित होत आहे, ज्यामध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे.

श्रीदेवीचा मृत्यू कसा झाला? : श्रीदेवीनं भारतीय चित्रपटसृष्टीवर पाच दशके राज्य केले आहे. ती एक दक्षिण भारतीय अभिनेत्री होती, तिनं तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नडसह 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. श्रीदेवीला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 2018 मध्ये श्रीदेवी संपूर्ण कुटुंबासह दुबईमध्ये एका लग्नासाठी गेली होती आणि लग्नानंतर दुसऱ्या दिवशी ती बाथरूमच्या बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळली होती. यानंतर देशात खळबळ उडाली होती. श्रीदेवी अशी अचानक जग सोडून जाणार असा अंदाज कोणीच लावला नव्हता. तिच्या अशा अचानक निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती.

हेही वाचा :

  1. 'मैदान' चित्रपटाला सेन्सॉरचा हिरवा कंदील, 'यूए' प्रमाणपत्रासह रिलीजचं मैदान मोकळं - maidaan Movie
  2. रणजीत यांनाही ऑफर झाली होती 'शोले'च्या गब्बरची भूमिका, मित्रासाठी दिला होता नकार - Sholay Gabbar Singh role
  3. 'चंदू चॅम्पियन'साठी कार्तिक आर्यननं घेतली कठोर मेहनत, 14 महिने गिरवले मराठीचे धडे - KARTIK AARYAN

Last Updated : Apr 4, 2024, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.