ETV Bharat / entertainment

'चंदू चॅम्पियन'साठी कार्तिक आर्यननं घेतली कठोर मेहनत, 14 महिने गिरवले मराठीचे धडे - KARTIK AARYAN

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 10:18 AM IST

Kartik Aaryan Chandu Champion: कार्तिक आर्यननं 'चंदू चॅम्पियन' चित्रपटासाठी 14 महिने मराठी भाषा शिकली आहे. या चित्रपटासाठी त्यानं खूप मेहनतही घेतली आहे. यासाठी त्यानं मराठी भाषेचे धडे गिरवले आहेत.

Kartik Aaryan Chandu Champion
कार्तिक आर्यन चंदू चॅम्पियन

मुंबई - Kartik Aaryan Chandu Champion: हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता कार्तिक आर्यननं त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. चित्रपटातील मराठी संवाद बोलण्यासाठी आणि बोली भाषा शिकण्यासाठी त्यानं 14 महिन्यांचे प्रशिक्षण घेतलं, असल्याचं सांगण्यात येत आहे. कार्तिकनं चित्रपटासाठी 14 महिने मराठी बोलीवर लक्ष केंद्रित केलं होतं. त्याच्याकडे एक शिक्षक होता ज्यानं त्याला भाषेवर चांगली पकड मिळवण्यास मदत केली. कार्तिकनं त्याच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रिलीज केला होता. या फर्स्ट लूकमध्ये त्याची हेअरकट लहान केसांची होती. याशिवाय त्यानं इंडियाचा ब्लेझर घातला होता. तसेच त्याच्या चेहऱ्यावर जखमांचे व्रण देखील दिसत होते.

'चंदू चॅम्पियन' चित्रपटासाठी कार्तिकनं घेतली मेहनत : 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट 14 जून 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं आहे. जानेवारी 2024 मध्ये त्यांनी 'चंदू चॅम्पियन'चे शूटिंग पूर्ण झालं असून या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर, कतरिना कैफ, पलक लालवानी, राजपाल यादव, भुवन अरोरा, विजय राज आणि इतर कलाकार दिसणार आहे. कार्तिकनं या चित्रपटासाठी वर्षभर साखर देखील खाल्ली नव्हती. शुटिंग पूर्ण केल्यानंतर त्यानं रसमलाई खाल्ली होती. याचा व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावर देखील शेअर केला होता. एक वर्षाहून अधिक कडक तयारी आणि जगभरात 8 महिने रात्रंदिवस शूटिंग केल्यानंतर आता हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

कार्तिक आर्यन वर्कफ्रंट : कार्तिकनं या चित्रपटासाठी कबीन खान आणि संपूर्ण टीमचं आभार देखील मानले होते. कार्तिकचे अनेक चाहते त्याच्या या चित्रपटाची वाट पाहात आहेत. या चित्रपटातून तो पहिल्यांदा एका खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाकडून कार्तिकला खूप अपेक्षा आहेत. कार्तिकच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो दिग्दर्शक हंसल मेहताचा आगामी चित्रपट 'कॅप्टन इंडिया' आणि अनीस बज्मीच्या 'भूल भुलैया 3' मध्ये देखील दिसणार आहे. याशिवाय तो 'आशिकी ३' आणि 'हेराफेरी 3' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. 'जोकर 2'च्या ट्रेलर रिलीजची प्रतीक्षा संपली, जोक्विन आणि लेडी गागाचे नवीन पोस्टर जारी - Joker 2 sequel
  2. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया या जोडप्यानं मुलाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली सुंदर पोस्ट - Bharti Singh sons birthday
  3. आयुष्मान खुरानानं आघाडीच्या म्युझिक कंपनीशी जागतिक रेकॉर्डिंग करारावर केली स्वाक्षरी - ayushmann khurrana
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.