ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2' मधील रश्मिका मंदान्नाचा 'श्रीवल्ली लूक' लॉन्च, निर्मात्यांनी चाहत्यांनी दिलं बर्थडे गिफ्ट - Srivalli first look

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 5, 2024, 5:20 PM IST

Srivalli first look : रश्मिका मंदान्ना शुक्रवारी 5 एप्रिल रोजी आपला 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाझदिवसाच्या निमित्तानं तिच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी चित्रपटातील फर्स्ट लुक पोस्टर शेअर केलं आहे.

Srivalli  first look
रश्मिका मंदान्नाचा 'श्रीवल्ली लूक' लॉन्च

मुंबई - Srivalli first look : नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना 5 एप्रिल 2024 रोजी तिचा 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी, तिच्या आगामी चित्रपट 'पुष्पा 2' चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटातील तिचा पहिला लुक लॉन्च केला. 'पुष्पा 2' हा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा: द राइज'चा सिक्वेल आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत.

'पुष्पा' फ्रँचायझीची निर्मिती कंपनी असलेल्या मैत्री मुव्हीज मेकर्स यांनी त्यांच्या अधिकृत एक्स सोशल मीडियावर रश्मिका मंदान्नाचा 'पुष्पा 2' मधील श्रीवल्ली लूक शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय: "हार्टथ्रोब रश्मिका उर्फ श्रीवल्ली हिला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. 'पुष्पा : द रुल'चा टिझर 8 एप्रिल रोजी येत आहे. 'पुष्पा मास जत्रा' चमकत आहे. 'पुष्पा : द रुल'चे ग्रँड रिलीज 15 ऑगस्ट 2024 ला जगभरात होणार आहे."

अभिनेत्री रश्मिका मंदान्नाला तिच्या खास वाढदिवसाच्या शुभेच्छा देत निर्मात्यांनी टीझर रिलीजची तारीखही जाहीर केली. 'पुष्पा 2' चा टीझर 8 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी शेअर केला जाणार आहे, तर चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुकुमार दिग्दर्शित आणि मैत्री मुव्हीज मेकर्स निर्मित या चित्रपटाचं आणखी एक मोठं आकर्षण आहे फहद फसिल. यात तो पुष्पाला टक्कर देणार आहे.

'पुष्पा' हा चित्रपट केवळ जबरदस्त हिट ठरला नाही, तर पहिल्या भागातल्या भूमिकेसाठी अल्लू अर्जुनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. गेल्या वर्षी ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अल्लूला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपट केवळ अल्लू अर्जुनेच अभिनयामुळे खळबळ उडवली नाही तर रश्मिका मंदान्नानं साकारेली भूमिकाही संस्मरणीय ठरली होती. यातील 'श्रीवल्ली' आणि 'सामी सामी' या चार्टबस्टर गाण्यांमुळेही खळबळ माजली होती. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, धनुंजया, राव रमेश, सुनील आणि अनसूया भारद्वाज यांच्या भूमिकांनीही कथानकाला हिट बनवलं होतं.

हेही वाचा -

  1. रश्मिका मंदान्नाचे सर्वोच्च सुपरहिट 10 चित्रपट, 'अ‍ॅनिमल' आणि 'गीता गोविंदम'ही नाहीत शीर्षस्थानी - Rashmika Mandanna Birthday
  2. अल्लू अर्जुननं 'पुष्पा: द रुल'च्या म्यूझिक रेकॉर्डिंग स्टुडिओतील संगीतकार आणि दिग्दर्शकाबरोबरचा फोटो केला शेअर - Pushpa The Rule
  3. पृथ्वीराज सुकुमारन स्टारर 'द गोट लाईफ' ऑस्कर पुरस्कार मिळवू शकेल, इस्त्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना विश्वास - Prithviraj Sukumaran
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.