ETV Bharat / bharat

CAA अंतर्गत १४ जणांना मिळालं भारतीय नागरिकत्व, प्रमाणपत्रांचा पहिला संच जारी - CAA Certificates Issued

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 9:53 PM IST

CAA Certificates Issued : एका महत्त्वाच्या घडामोडीत, केंद्रीय गृह मंत्रालयानं बुधवारी राजधानीत नागरिकत्व (सुधारणा) कायदा (CAA) अंतर्गत 14 लोकांना नागरिकत्व प्रमाणपत्रांचा पहिला संच सुपूर्द केला. मार्चमध्ये केंद्राने सीएए नियम अधिसूचित केले होते.

CAA Certificates Issued
सीएए सर्टिफिकेट (Reporter)

नवी दिल्ली CAA Certificates Issued : नागरिकत्व (सुधारणा) कायदा (CAA) अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रांचा पहिला संच बुधवारी येथे 14 लोकांना जारी करण्यात आला. ज्याने पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू केली.

'सीएए'ची ठळक वैशिष्ट्ये : अधिकृत प्रवक्त्याने सांगितलं की, केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी नियुक्त केलेल्या पोर्टलद्वारे 14 लोकांच्या अर्जांवर ऑनलाइन प्रक्रिया केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्रे सुपूर्द केली. "गृह सचिवांनी अर्जदारांचं अभिनंदन केलं आणि नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2024 ची ठळक वैशिष्ट्ये हायलाइट केली. संवादात्मक सत्रादरम्यान सचिव पोस्ट, डायरेक्टर (IB), भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

CAA ला राष्ट्रपतींची संमती, परंतु... : बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना 31 डिसेंबर 2014 रोजी किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्यांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी CAA डिसेंबर 2019 मध्ये लागू करण्यात आला. यामध्ये हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांचा समावेश आहे. कायद्यानंतर, CAA ला राष्ट्रपतींची संमती मिळाली; परंतु ज्या नियमांनुसार भारतीय नागरिकत्व दिले गेले ते नियम चार वर्षांच्या विलंबानंतर या वर्षी 11 मार्च रोजी जारी करण्यात आले.

'या' समुदायातील व्यक्तींकडून अर्ज प्राप्त : नियमांमध्ये अर्जाची पद्धत, जिल्हास्तरीय समिती (DLC) द्वारे अर्जांवर प्रक्रिया करण्याची प्रक्रिया आणि राज्यस्तरीय अधिकार प्राप्त समितीद्वारे (EC) छाननी आणि नागरिकत्व प्रदान करणे समाविष्ट आहे. "या नियमांच्या अनुषंगाने, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील व्यक्तींकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्यांनी 31.12.2014 पर्यंत भारतात प्रवेश केला आहे, असे प्रवक्त्याने सांगितले.

अर्जदारांना दिली निष्ठेची शपथ : पदनाम अधिकारी म्हणून पोस्टाचे वरिष्ठ अधीक्षक/पोस्ट अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समित्यांनी (DLCs) कागदपत्रांची यशस्वी पडताळणी करून, अर्जदारांना निष्ठेची शपथ दिली आहे, असं त्यात म्हटलं आहे. "नियमांनुसार प्रक्रिया केल्यानंतर, DLCs ने संचालक (जनगणना ऑपरेशन) यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय अधिकारप्राप्त समितीकडे अर्ज पाठवले आहेत. अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पोर्टलद्वारे केली जाते. संचालक (जनगणना ऑपरेशन), दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली अधिकार प्राप्त समिती, दिल्ली, योग्य छाननीनंतर 14 अर्जदारांना नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संचालक (जनगणना ऑपरेशन) यांनी या अर्जदारांना प्रमाणपत्रे दिली आहेत," असे प्रवक्त्याने सांगितले.

हेही वाचा :

  1. घाव घातला तर झाडातून निघतं रक्त? अनेक आजारांवर 'हे' झाड आहे गुणकारी, जाणून घ्या वैशिष्ट्ये - Indian redwood tree
  2. महायुतीला 40 पेक्षा अधिक जागा मिळतील, मंत्री दीपक केसरकर यांना विश्वास - Deepak Kesarkar Opinion
  3. ओबीसींच्या आरक्षणाची लूट करण्याचा कॉंग्रेसचा डाव... कल्याणमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप - PM Narendra Modi On Congress
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.