ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' ट्रेलरसाठी काउंट डाऊन सुरू!! - Bade Miyan Chote Miyan Trailer

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 12:43 PM IST

Bade Miyan Chote Miyan Trailer
'बडे मियाँ छोटे मियाँ' ट्रेलर

Bade Miyan Chote Miyan Trailer : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या भूमिका असलेल्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. याच्या ट्रेलरसाठीचे काउंट डाऊन सुरू झाले आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात आलिया एफ आणि मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत आहेत. 'बडे मियाँ छोटे मियाँ' ट्रेलर कधी रिलीज होणार हे जाणून घेण्यासाठी वाचा.

मुंबई - Bade Miyan Chote Miyan Trailer : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हे दोघेही स्टार्स थरारक स्टंट्स आणि चित्तथरारक अ‍ॅक्शन दृश्यांसाठी ओळखले जातात आणि या चित्रपटात त्यांना एकत्र पाहणे ही त्यांच्या चाहत्यांना एक वेगळी पर्वणी असू शकते.

आता या दोन अ‍ॅक्शन स्टार्सच्या अ‍ॅक्शन-पॅक ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अक्षय आणि टायगर एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी एकत्र येत असताना प्रेक्षकांनीही त्यांच्या मनाची तयारी करुन ठेवली आहे. सोशल मीडियावर या बाबत पोस्ट लिहून ते आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.

अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्टर शेअर केले असून यामध्ये ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली आहे. पोस्टरमध्ये अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, अलाया एफ आणि मानुषी छिल्लर यांचा राकट लूक दिसत आहे. अक्षयनं कॅप्शनमध्ये 'बडे मियाँ छोटे मियाँ' हे मोठा डोस देण्यासाठी येणार असून याचा ट्रेलर २६ मार्च रोजी प्रदर्शित होत असल्याचं कळवलंय.

यापूर्वी 24 जानेवारी रोजी 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर 1 मिनिट आणि 38 सेकंदांच्या क्लिपद्वारे चाहत्यांना याची एक झलक दाखवली होती. यामध्ये प्रेक्षकांना आश्चर्यकारक लोकेशन्स दिसली होती. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची भव्य एन्ट्री देशाच्या रक्षणासाठी सज्ज असल्याची खात्री देत होती.

दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये समर्पण आणि मेहनत यावर प्रचंड भर दिला होता. 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाला इतके सुंदर बनवल्याबद्दल त्याने सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि क्रूचे आभार मानले होते. हा चित्रपट ईदला प्रदर्शित करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले होते. एप्रिल 2024 मध्ये ईदच्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करण्याबद्दल त्यांनी उत्सुकता व्यक्त केली होती.

अक्षय आणि टायगर यांच्या शिवाय 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन आणि मानुषी छिल्लर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. सोनाक्षी सिन्हा, अलाया एफ आणि रोनित रॉय हे देखील कलाकारांच्या जोडीचा भाग आहेत. चित्रपटाचे संगीत विशाल मिश्रा यांनी तयार केलें आहे आणि इर्शाद कामिल यांनी याची गाणी लिहिली आहेत. चित्रपटाची कोरिओग्राफी बॉस्को आणि सीझर यांनी हाताळली आहे.

हेही वाचा -

'मडगाव एक्स्प्रेस' आणि 'स्वातंत्र्य वीर सावरकर'नं रिलीज पहिल्या दिवशी किती कमाई केली घ्या जाणून - Box office collection day 1

'स्वातंत्र्य वीर सावरकर' स्क्रिनिंगमध्ये पापाराझींवर भडकली अंकिता लोखंडे - Ankita Lokhande Lashes out at Paps

कार्तिक आर्यनने शेअर केली 'भूल भुलैया 3' शूटची झलक, विशाल भारद्वाजच्या चित्रपटासाठीही होतोय सज्ज - Kartik in Bhool Bhulaiyaa 3

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.