ETV Bharat / entertainment

'मडगाव एक्स्प्रेस' आणि 'स्वातंत्र्य वीर सावरकर'नं रिलीज पहिल्या दिवशी किती कमाई केली घ्या जाणून - Box office collection day 1

Box office collection day 1 : 'मडगाव एक्स्प्रेस' आणि 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हे चित्रपट 22 मार्च रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटांनी रिलीजच्या पहिल्या दिवशी निराशाजनक कलेक्शन केलं आहे.

Box office collection day 1
बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 10:26 AM IST

मुंबई - Box office collection day 1 : अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे स्टारर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' आणि कुणाल खेमू दिग्दर्शित 'मडगाव एक्स्प्रेस' 22 मार्च रोजी एकत्र प्रदर्शित झाले आहेत. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' आणि 'मडगाव एक्स्प्रेस' या दोन्ही चित्रपटांची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही चांगलीच दमदार आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा बायोपिक आहे तर 'मडगाव एक्सप्रेस' हा कॉमेडी चित्रपट आहे. दरम्यान, या दोन्ही चित्रपटांचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.

'मडगाव एक्सप्रेस' बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'स्वातंत्र्य वीर सावरकर' आणि 'मडगाव एक्स्प्रेस'च्या पहिल्या दिवशी चांगली कमाई करणार अशी अपेक्षा होती. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'मडगाव एक्स्प्रेस'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.5 कोटीची कमाई केली आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट बॅनरखाली बनलेला 'मडगाव एक्सप्रेस' हा चित्रपट तीन मित्रांवर आधारित आहे. दिव्येंदू शर्मा, अविनाश तिवारी आणि प्रतीक गांधी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय नोरा फतेही 'मडगाव एक्सप्रेस'मध्ये आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या दुसऱ्या दिवसात आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी हा चित्रपट चांगली कामगिरी करेल असं अशी अपेक्षा केली जात आहे.

'स्वातंत्र्य वीर सावरकर' बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसारच्या आकडेवारीनुसार, 'स्वातंत्र्य वीर सावरकर'नं पहिल्या दिवशी 1.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट वीर सावरकर यांचा जीवनपट आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' रणदीप हुड्डा दिग्दर्शित आहे आणि झी स्टुडिओजसाठी आनंद पंडित, संदीप सिंह आणि योगेश राहर यांनी निर्मित केला आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे आणि अमित सियाल मुख्य भूमिकेत आहेत. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट पहिल्या वीकेंडला चांगली कमाई करेल अशी अपेक्षा केली जात आहे. या चित्रपटाकडून रणदीप हुड्डाला खूप अपेक्षा होती, कारण त्यानं या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे.

हेही वाचा :

  1. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' स्क्रिनिंगमध्ये पापाराझींवर भडकली अंकिता लोखंडे - Ankita Lokhande Lashes out at Paps
  2. कार्तिक आर्यनने शेअर केली 'भूल भुलैया 3' शूटची झलक, विशाल भारद्वाजच्या चित्रपटासाठीही होतोय सज्ज - Kartik in Bhool Bhulaiyaa 3
  3. दिवंगत गायक सिद्धू मूसवालाच्या नवजात भावाचा न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवरील व्हिडिओ व्हायरल - Sidhu Moosewala Newborn Brother

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.