ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणूक 2024: सहाव्या टप्प्यात आठ राज्यांतील 58 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू, 9 वाजेपर्यंत 10.82 टक्के मतदान - Lok Sabha Election 2024 Phase 6

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 7:08 AM IST

Updated : May 25, 2024, 10:18 AM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या सहाव्या टप्प्यात आज (25 मे) आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 58 जागांवर मतदान सुरू आहे. यासोबतच सहाव्या टप्प्यात जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग-राजौरी मतदारसंघासाठीही मतदान होत आहे. या निवडणुकीत विविध राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

LOK SABHA ELECTION 2024 PHASE 6
लोकसभा निवडणूक सहावा टप्पा (ETV Bharat)

हैदराबाद Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सहाव्या टप्प्यासाठी आज (25 मे) 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 58 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे. सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात अनेक दिग्गजांचं भवितव्य पणाला लागलंय. या टप्प्यात एकूण 889 उमेदवार रिंगणात असून यापैकी सर्वाधिक 223 उमेदवार हे हरियाणातील आहेत. तर किमान 20 उमेदवार जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत.

Live Updates :

  • काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी मतदानासाठी पोहोचल्या.
  • काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी निर्माण भवनातील मतदान केंद्रात मतदान केलं, मतदानानंतर त्यांनी सेल्फी काढला.
  • आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवान यांनी दिल्लीत मतदान केलं.
  • माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्लीत मतदानाचा हक्क बजावला.

आठ राज्यांमध्ये 9 वाजेपर्यंत 10.82 टक्के मतदान :

  1. बिहार (8 जागा): 9.66
  2. हरियाणा (10 जागा): 8.31
  3. जम्मू आणि काश्मीर (1 जागा): 8.89
  4. झारखंड (4 जागा): 11.74
  5. दिल्ली (7 जागा): 8.94
  6. ओडिशा (6 जागा): 7.43
  7. उत्तर प्रदेश (14 जागा): 12.33
  8. पश्चिम बंगाल (8 जागा): 16.54
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
  • पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कमलजीत सेहरावत यांनी मतदान केले.
  • काँग्रेसचे उमेदवार जेपी अग्रवाल यांनी चांदनी चौक जागेवरून मतदान केलं. यावेळी भाजपा 100 च्या खाली जाऊ शकतो, अशी टीका त्यांनी केली.
  • काँग्रेसचे उमेदवार उदित राज यांनी उत्तर पश्चिम मतदारसंघातून 5 लाख मतांनी विजयी होणार असल्याचा दावा केला.
  • दिल्ली राज्याचे निवडणूक आयुक्त विजय देव पत्नीसह मतदान केंद्रावर पोहोचले.
  • दिल्लीच्या बुरारी आणि देवळीमध्ये मतदानासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा, मतदारांमध्ये दिसून येतोय उत्साह
  • दिल्लीतील तुघलकाबाद भागातील बूथवर सकाळी 7 वाजता मतदारांची गर्दी
  • परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हे त्यांच्या पत्नीसह मतदान करण्यासाठी तुघलक लेन येथील अटल आदर्श विद्यालयात आले होते. मात्र, येथे मतदार यादीत नाव नसल्यानं त्यांनी दुसऱ्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं.
  • केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी पत्नी लक्ष्मी पुरीसोबत मतदान करण्यासाठी पोहोचले.
  • नवी दिल्लीतील भाजपाचे लोकसभा उमेदवार बन्सुरी स्वराज यांनी झंडेवालान मंदिरात प्रार्थना केली. आम आदमी पक्षाने येथून सोमनाथ भारती यांना उमेदवारी दिली आहे.
  • हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नाल लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार मनोहर लाल खट्टर यांनी हरियाणाच्या कर्नालमध्ये मतदान केलंय.

सहाव्या टप्प्यात राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह हरियाणातील सर्व 10 जागांवर मतदान होत आहे. याशिवाय उत्तर प्रदेशच्या 14 जागा, बिहार आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी आठ जागा, ओडिशाच्या सहा जागा, झारखंडच्या चार आणि जम्मू-काश्मीरच्या एका जागेवरही मतदान होतय.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये धर्मेंद्र प्रधान (भाजपा) संबलपूर (ओडिशा), मनोज तिवारी (भाजपा) आणि कन्हैया कुमार (काँग्रेस) ईशान्य दिल्ली, सुलतानपूर (उत्तरप्रदेश) मेनका गांधी (भाजपा), अनंतनाग-राजौरी (जम्मू आणि काश्मीर) मधून मेहबूबा मुफ्ती (पीडीपी), तमलूक (पश्चिम बंगाल) मधून अभिजित गंगोपाध्याय (भाजपा), आणि भाजपाकडून मनोहर लाल खट्टर (कर्नाल, हरियाणा), नवीन जिंदाल (कुरुक्षेत्र) आणि राव इंद्रजीत सिंग (गुडगाव) यांचा समावेश आहे.

या 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये होणार मतदान

  • नवी दिल्ली: चांदनी चौक, उत्तर पूर्व दिल्ली, पूर्व दिल्ली, नवी दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली
  • हरियाणा: अंबाला, कुरुक्षेत्र, सिरसा, हिस्सार, कर्नाल, सोनीपत, रोहतक, भिवानी-महेंद्रगड, गुरुग्राम, फरीदाबाद.
  • उत्तर प्रदेशः सुलतानपूर, प्रतापगढ, फुलपूर, अलाहाबाद, आंबेडकर नगर, श्रावस्ती, डुमरियागंज, बस्ती, संत कबीर नगर, लालगंज, आझमगढ, जौनपूर, मच्छलीशहर, भदोही.
  • बिहार: वाल्मिकी नगर, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, श्योहर, वैशाली, गोपालगंज, सिवान, महाराजगंज.
  • झारखंड: गिरिडीह, धनबाद, रांची, जमशेदपूर
  • ओडिशा: संबलपूर, केओंझार, ढेंकनाल, कटक, पुरी, भुवनेश्वर
  • पश्चिम बंगाल: तमलूक, कंठी, घाटल, झारग्राम, मेदिनीपूर, पुरुलिया, बांकुरा, बिष्णुपूर.
  • जम्मू आणि काश्मीर: अनंतनाग-राजौरी

सहाव्या टप्प्यातील प्रमुख मतदारसंघ :

  • सुलतानपूर (उत्तर प्रदेश)
  • अलाहाबाद (उत्तर प्रदेश)
  • आंबेडकर नगर (उत्तर प्रदेश)
  • संत कबीर नगर (उत्तर प्रदेश)
  • आझमगड (उत्तर प्रदेश)
  • भदोही (उत्तर प्रदेश)
  • गुरुग्राम (हरियाणा)
  • फरीदाबाद (हरियाणा)
  • अंबाला (हरियाणा)
  • संबलपूर (ओडिशा)
  • भुवनेश्वर (ओडिशा)
  • पुरी (ओडिशा)
  • तमलूक (पश्चिम बंगाल)
  • मेदिनीपूर (पश्चिम बंगाल)
  • धनबाद (झारखंड)
  • रांची (झारखंड)
  • जमशेदपूर (झारखंड)
  • अनंतनाग-राजौरी (जम्मू आणि काश्मीर)

आत्तापर्यंत लोकसभेचे पाच टप्पे पूर्ण झालेत. निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सर्वात कमी 62.2 टक्के मतदान झालं. तर चौथ्या टप्प्यात सर्वाधिक 69.16 टक्के मतदान झालं. तसंच पहिल्या टप्प्यात 66.14 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के आणि तिसऱ्या टप्प्यात 65.68 टक्के मतदान झालं. तर शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे.

हेही वाचा -

  1. लोकसभेचा अचूक अंदाज सांगा आणि बक्षीस मिळवा; पुण्यातील अनोख्या स्पर्धेची सर्वत्र चर्चा - lok sabha election 2024
  2. मुंबईत संथगतीनं मतदान... मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश - lok sabha election
  3. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ६०.०९ टक्के मतदान, महाराष्ट्रात किती मतदान झाले? - voter turn out in fifth phase
Last Updated : May 25, 2024, 10:18 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.