No Load Shedding In Maharashtra : राज्यात कुठेही भारनियमन नाही - ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा दावा, पहा एक्सक्लुसिव्ह मुलाखत

By

Published : Apr 19, 2022, 8:48 PM IST

thumbnail

मुंबई : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विजेचा तुटवडा ( Power Shortage In Maharashtra ) जाणवत होता. मात्र आजची परिस्थिती पाहता राज्यात कुठेही भारनियमन ( No Load Shedding In Maharashtra ) नाही, असा दावा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत ( Energy Minister Nitin Raut ) यांनी ईटीव्ही भारतच्या विशेष मुलाखतीत बोलताना केला. राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून जनतेला भारनियमनाचे चटके सहन करावे लागत होते. मात्र आजमितीला ही परिस्थिती सुधारली असून, कोणताही भारनियमन केले जात नसल्याचा दावा राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारने मध्यप्रदेश येथे एक कोळसा खाण विकत घेतली ( Maharashtra Bought coal mine In MP ) असून, पुढच्या वर्षीपासून राज्याची स्वतःची कोळशाची खाण असेल अशी माहिती त्यांनी दिली. सध्या कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र त्याला विविध कारणे आहेत, असही राऊत यांनी सांगितले. दरम्यान राज्यातील विजेची गळती कमी करण्यात प्रशासनाला यश आल्याचं सांगात त्यांनी यापुढे कृषी पंपाच्या वीज दुरुस्ती बाबत काही चुकीची माहिती दिली जात असल्याचे स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.