ETV Bharat / sukhibhava

Snake Venom : नेमकी काय आहे 'स्नेक व्हेनम' नशा; जाणून घ्या काय होतो शरीरावर परिणाम

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 3:59 PM IST

Updated : Nov 3, 2023, 5:06 PM IST

Snake venom : नशेची आणखी एक पद्धत अलिकडे पुन्हा प्रचलित होत आहे. ज्याला 'स्नेक व्हेनम' ( सापाचे विष ) नशा म्हणतात. ही नशा आणि त्याचं व्यसन काय आहे आणि ते किती धोकादायक आहे? जाणून घ्या.

Snake venom
स्नेक व्हेनोम

हैदराबाद : पूर्वीच्या काळी विषकन्या असायच्या. त्यांचा वापर विरोधी राजे महाराजांना संपवण्यासाठी होत असे. त्या काळात सापांच्या विषाची नशाही केली जायची असे काही उल्लेख आपल्याला पुराणकथांमध्ये वाचायला मिळतात. विरोधी राजांना संपवण्यासाठी या विषकन्यांची भुरळ पाडण्यात येत असे. त्यानंतर या विषकन्यांचा संग या राजांनी केल्यावर त्यांचा मृत्यू होत असे, अशा प्रकारच्या या कथा आहेत. आता आधुनिक काळात हेरॉईन, कोकेन, चित्ता, MDMA, मॉर्फिनच्या नशेत युवा पिढीतील काही तरुण बरबाद होत असल्याचं तुम्ही वाचलं असेल. कदाचित ते तुम्ही लोकांनी पाहिलंही असेल. पण आता पुराणकाळातील सापाच्या विषाच्या नशेचा प्रकार पुन्हा फणा काढताना दिसतंय. देशात सापाच्या विषाची नशा करण्याचा एक मार्ग नव्यानं फोफावत आहे, ज्याला 'स्नेक व्हेनम' नशा म्हणतात. सापाच्या विषाचं व्यसन हा चर्चेचा विषय बनला आहे. कारण एल्विश यादव या प्रख्यात यूट्युबरवर यासंदर्भात आरोप झालाय. पाहूया ही नशा किंवा व्यसन आहे तरी काय?

'स्नेक व्हेनम' हजारो वर्षांपासून वापरलं जात आहे : जगभरात एक लाखाहून अधिक प्राण्यांचं विष सापडतं. प्राण्यांचं विष हे एंजाइमॅटिक आणि नॉन-एंझाइमॅटिक यौगिकांचं जटिल मिश्रण असतं. हे विष साप, मासे, कीटक आणि कोळी, स्टारफिश तसंच समुद्री अर्चिन, जेलीफिश आणि कोरल यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांपासून मिळतं. प्राण्यांच्या विष ग्रंथीतून विष बाहेर पडतात. पारंपारिक औषधांमध्ये हजारो वर्षांपासून सापाचं विष वापरलं जात आहे. हजारो वर्षांपूर्वी चेचक आणि कुष्ठरोगावर उपचार करण्यासाठी आणि जखमा भरण्यासाठी प्राण्यांच्या विषाचा वापर केला जात असे. यामध्ये सापाच्या विषाचाही समावेश आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात थेरियाक नावाचा पदार्थ आयुर्वेद तज्ञांनी तयार केला होता, जो सापाच्या विषाचं मिश्रण होता. याचा वापर 18 व्या शतकापर्यंत चालू राहिला. यानंतर अल्बर्ट कॅल्मेट नावाच्या तज्ज्ञानं प्राण्यांमध्ये विषाचा छोटा डोस देऊन अँटीव्हेनम तयार करण्याची पद्धत शोधून काढली.

सापाच्या विषाची नशा कशी केली जाते : कोब्रा व्हेनमची नशा ही जगातील सर्वात मोठी नशा आहे. कोब्रा विषाची नशा करण्याचा ट्रेंड जगभरात वाढू लागला आहे. भारतात हा ट्रेंड जोर धरू लागला आहे, त्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. साप आणि नागांच्या तस्करीची प्रकरणं आणि तस्करांना अटक करणं ही त्याची उदाहरणं आहेत. 2017 मध्ये बिहारमधून 70 कोटी रुपयांचं कोब्रा विष जप्त करण्यात आलं 2018 मध्ये, PGIMR चंदीगडच्या डॉक्टरांनी राजस्थानमधील दोन तरुणांवर संशोधन केलं. त्या मुलांनी डॉक्टरांना सांगितलं होते की कोब्राच्या विषाचा वास त्यांना आकर्षित करतो आणि ते विष खाल्ल्यानंतर त्यांना नशा चढते. एवढेच नाही तर त्यांच्या जिभेवर कोब्रा साप चावला, त्याने थोडासा धक्का बसला, परंतु त्यानंतर ते तासभर हरवून गेले आणि त्यात त्यांना जो आनंद वाटला ते सांगू शकत नाही. या विषाचा एक थेंब लाखो रुपयांचा आहे. अनेक वेळा या व्यसनामुळं लोकांचे मृत्यू झालेलेही पहायला मिळतात.

विषाच्या नशेचा परिणाम किती काळ टिकतो - विष घेतल्यावर शरीरावर हँगओव्हर किमान पाच दिवस टिकतो. त्याची नशा पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जास्त असते. ही नशा अत्यंत धोकादायक आहे, म्हणूनच भारतासह जगातील अनेक देशांमध्ये ती बेकायदेशीर आहे. याचं सेवन करताना कोणी पकडलं गेलं तर त्याला शिक्षा होऊ शकते. एल्विशच्या निमित्तानं याची चर्चा आता पुन्हा जोर धरु लागली आहे.

हेही वाचा :

  1. FIR against Elvish Yadav : एल्विश यादवच्या नसानसात भरलंय 'विष'? तस्करी प्रकरणी पाच साथीदारांसह 9 विषारी साप ताब्यात
  2. Elvis yadav and Arjun bijlani : 'बिग बॉस ओटीटी 2' फेम एल्विश यादवनं दिली अर्जुन बिजलानीच्या ट्विटवर प्रतिक्रिया...
  3. Elvish Yadav Extortion Call: एल्विश यादवकडून खंडणी मागणारा गजाआड

Last Updated : Nov 3, 2023, 5:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.