Elvish Yadav Extortion Call: एल्विश यादवकडून खंडणी मागणारा गजाआड

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 11:38 AM IST

Elvish Yadav Extortion Call

Elvish Yadav Extortion Call: 'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता एल्विश यादवकडून खंडणीची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, आता याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

मुंबई - Elvish Yadav Extortion Call: 'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता एल्विश यादव काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. महागड्या गाड्यांच्या आवडीमुळे तो एरवीही प्रसिद्ध आहे. त्याचा अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत एक म्युझिक अल्बमही रिलीज झाला आहे. या म्युझिक अल्बमचं सोशल मीडियावर खूप कौतुक झालं होते. प्रोफेशनल करिअरमध्ये खूप यश मिळवत असलेल्या एल्विश यादवशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. एल्विश यादवकडून एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, आता पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.

एल्विश यादव खंडणी प्रकरण : खंडणीच्या कॉलनंतर एल्विशनं गुरुग्राममधील सेक्टर 53 पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एल्विशनं या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑक्टोबर रोजी सेक्टर 53 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एल्विशला एका नंबरवरून कॉल करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. वजिराबाद गावातून एल्विशला फोन आला होता. एसीपी क्राइम वरुण दहिया हे दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती देणार आहेत. एल्विश यादव हा प्रसिद्ध यूट्यूबर आहे. अलीकडेच त्यानं 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' जिंकला होता. हा शो जिंकल्यानंतर त्याला हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळायला सुरुवात झाली. यूट्यूब चॅनेलवर एल्विश यादवचे सध्या सुमारे 14.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. एल्विश यादव व्लॉग्स नावाचं त्याचं आणखी एक यूट्युब चॅनेल आहे, जिथे त्यांचे सुमारे 7.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्याचे इंस्टाग्रामवर 16 दशलक्षाहून अधिक चाहते आहेत.

एल्विश यादव बिग बॉस ओटीटीचा विजेता : एल्विशनं 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता. या शोमध्ये पोहोचताच त्यानं प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. तो हो शो जिंकला. 'बिग बॉस'च्या इतिहासात वाईल्ड कार्ड प्रवेशद्वारे पहिल्यांदा एल्विश यादव विजयी झाला आहे. सध्या एल्विश हा यशाचा आनंद घेत आहे. आता त्याला चित्रपट आणि म्युझिक अल्बमच्या मोठ्या ऑफर्स मिळत आहेत.

हेही वाचा :

  1. IAS Abhishek Singh Album : माजी आयएएस अभिषेक सिंग सनी लिओनीसोबत करणार रोमान्स; व्हिडिओ व्हायरल...
  2. Asin Share pics and video : मुलगी अरिनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करण्यासाठी असिननं एका वर्षानंतर इंस्टाग्रामवर केले पुनरागमन...
  3. Battalion 50 : 'बटालियन 50'मधून दिसणार सीमेवरील शूरवीरांची गाथा; लवकरच मोठ्या पडद्यावर होणार प्रदर्शित....
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.