Elvis yadav and Arjun bijlani : 'बिग बॉस ओटीटी 2' फेम एल्विश यादवनं दिली अर्जुन बिजलानीच्या ट्विटवर प्रतिक्रिया...

Elvis yadav and Arjun bijlani : 'बिग बॉस ओटीटी 2' फेम एल्विश यादवनं दिली अर्जुन बिजलानीच्या ट्विटवर प्रतिक्रिया...
Elvis yadav and Arjun bijlani : 'बिग बॉस ओटीटी 2' चा विजेता एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एल्विशनं नुकतीच अर्जुन बिजलानीच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत.
मुंबई - Elvis yadav and Arjun bijlani : 'बिग बॉस ओटीटी 2' चा विजेता एल्विश यादव हा शो जिंकून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. 'बिग बॉस ओटीटी 2' शो जिंकून एल्विश यादवनं इतिहास रचला आहे. बिग बॉसमध्ये त्यानं वाइल्डकार्ड एंट्री घेऊन शोमध्ये खळबळ उडवून दिली होती. एल्विशची स्पर्धा ही अभिषेक मल्हान आणि मनीषा राणी यांच्याशी होती. एल्विश हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. शो जिंकल्यानंतरही त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांचे आभार मानले होते. त्यानंतर काही लोकांनी एल्विश हा शोचा योग्य विजेता नसल्याचं सांगितलं होतं.
-
Mujhe Ab Pata Laga Tum Woman Ho🥹 https://t.co/FHyyzuYJUM
— Elvish Yadav (@ElvishYadav) September 17, 2023
एल्विश यादव दिली प्रतिक्रिया : अर्जुन बिजलानीनं एक ट्विट केलं होतं, ज्यामध्ये त्यानं थेट बिग बॉसच्या विजेत्यावर निशाणा साधला होता. या ट्विटमध्ये अर्जुन बिजवलीनं लिहिलं, 'बिग बॉस जिंकल्यानंतर काही लोक आणि त्यांचे फॅन क्लब महिलांचा आदर करणे विसरले आहेत. दु:खद!!' अर्जुननं हे कोणासाठी लिहिलं आहे याचा उल्लेखही त्यानं केला नाही. त्यानंतर आता यूट्यूबर एल्विश यादवनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. या वक्तव्यवर त्याने ट्विटला रिप्लाय देत लिहिलं, 'मला आता कळले आहे की तू एक महिला आहेस.' एल्विश यादवचं हे ट्विट वाऱ्यासारखी व्हायरल झालं आहे. त्यानंतर या वादावर अनेकजण ट्विट करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
बिग बॉसच्या विजेत्याची पातळी घसरली : या वादावर युजरनं एल्विश यादवचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये यूट्यूबर मुलींना घरातील काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहेत. या गोष्टीला अनेकजण पाठिंबा देत असल्याचं देखील दिसत आहे. बिग बॉसच्या विजेत्याची पातळी घसरत असल्याचेही एका यूजरनं लिहिलं आहे. याआधी एल्विश जिया शंकरच्या व्लॉग्समध्ये दिसला होता. त्या व्लॉगची एक क्लिप व्हायरल झाली होती. व्हायरल क्लिपमध्ये, एल्विशनं सांगितलं होत की तो बिग बॉसचा योग्य विजेता आहे. याशिवाय त्याला विजेता झाल्यानंतर अनेकांनी ट्रोल केले होतं, असं त्यानं यावेळी सांगितलं होत. यावेळी त्यानं दुबईत घर विकत घेतल्याचा खुलासा केला. त्यानंतर त्यानं यूट्यूब चॅनेलवर त्याचा होम व्हिडिओ देखील शेअर केला आहे. तसेच त्यांच्या घराची किंमत 8 कोटी रुपये असल्याचं त्यानं सांगितलं आहे.
हेही वाचा :
