ETV Bharat / state

Search Of Bogus Doctor : ५ रुग्णांचा बळी घेतल्यानंतर बोगस डॉक्टरची शोध मोहीम

author img

By

Published : Feb 7, 2022, 4:35 PM IST

Search of bogus doctor
बोगस डॉक्टरची शोध मोहीम

मुरबाड तालुक्यातील धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात (Dhasai Primary Health Center) चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेला शिपाई आरोपी पांडुरंग घोलप याने १२ वर्ष धसई गावातील घरातच दवाखाना थाटला होता. त्याच्या चुकी मुळे पाच आदिवासींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घोलपवर गुन्हा दाखल झाला त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाला खडबडून जाग (Wake up the health department) आली. त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातील डॉक्टरांची झाडाझडती सुरू केली आहे.

ठाणे: आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात सर्वाधिक ११ बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कल्याण आणि मुरबाड तालुक्यातही बोगस डॉकटर सापडल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून बोगस डॉक्टरांवर आळा बसावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अधिकृत वैद्यकीय व्यवसायीकांची यादी दर्शनी भागात लावावी. तसेच प्रत्येक ग्रामसभेत अधिकृत डाॅक्टरांच्या नावांचे वाचन करावे, अशा सूचना सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी दिल्या आहे.

मुरबाड तालुक्यातील बोगस डाॅक्टर भूमिगत ..
मुरबाड तालुक्यात घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर आरोग्य विभागाने तालुक्यातील टोकावडे येथील बोगस डॉक्टर विठ्ठल बुरबुडा आणि मोरोशी येथील प्रमोद धनगर या दोघांवर कारवाई केली. दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर उमरोली गावातील एक बंद दवाखाना सील केला. या कारवाईमुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी आपली दुकाने बंद करून पळ काढायला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात ग्रामस्थांच्या अज्ञानाचा फायदा घेत असे अनेक बोगल लोक बिनधास्तपणे डॉक्टर बनून आपली दुकाने चालवतायत. मात्र याची खबर आरोग्य यंत्रणांना नसल्याने आजपर्यत त्यांचे फावत गेले.

आरोग्य विषयक जनजागृतीवर भर..
उपजिल्हा अधिकारी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध समितीची बैठक झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, पोलीस उपअधीक्षक श्री. मुणगेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोषी शिंदे, अन्न व औषध प्रशासन विभाग, पोलिस, तालुका आरोग्य अधिकारी संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते. मुरबाडच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत बोगस डॉक्टर शोध मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणेने तालुक्यातील अन्य यंत्रणेशी समन्वय करून हि मोहिम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी ठोंबरे यांनी दिल्या. ग्रामीण भागात विशेषता आदिवासी वस्ती, पाड्यांमध्ये आरोग्य विषयक जनजागृतीवर भर द्यावा स्थानिक बोलीभाषेत त्यांना ही माहिती द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तालुका यंत्रणेची आढावा बैठक दर महिण्याला होणार
गावात होणाऱ्या ग्रामसभांमध्ये गावात अधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची यादीचे वाचन करावे जेणेकरून ग्रामस्थांना त्याची माहिती मिळू शकेल त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात फलकावर गावातील अधिकृत वैद्यकीय व्यवसायीकांची नावे लिहावीत. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी गावातील, तालुक्यातील अन्य विभागाच्या समन्वयातून ही कारवाई करावी असे ठोंबरे यांनी सांगितले. दरमहा तालुका यंत्रणेने आढावा घ्यावा आणि त्याबाबतचा अहवाल जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.