ETV Bharat / state

cousin Murder : अर्ध्या एकर शेतीच्या वादातून दगडाने ठेचून चुलत भावाची केली हत्या

author img

By

Published : Nov 20, 2021, 11:57 AM IST

Updated : Nov 20, 2021, 5:08 PM IST

Murder of cousin by stoning in half acre farm dispute
अर्ध्या एकर शेतीच्या वादातून दगडाने ठेचून चुलत भावाची केली हत्या

अर्ध्या एकर शेतीच्या वादातून दगडाने ठेवून चुलत भावाची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेचा छडा लावण्यात मानपाडा पोलिसांना (Manpada Police) यश आले आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या पथकाने एका आरोपीला झारखंडमध्ये जाऊन ताब्यात घेतले.

ठाणे - 20 गुंठे जमिनीच्या वादातून दोघा सख्या चुलत भावांनी एका चुलत भावाची दारूची पार्टी सुरु असतानाच दगडाने ठेचून निर्घृण हत्या (cousin Murder) केल्याच्या धक्कादायक घटनेचा छडा लावण्यात मानपाडा पोलिसांना (Manpada Police) यश आले आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या पथकाने एका आरोपीला झारखंडमध्ये जाऊन ताब्यात घेतले. मात्र या हत्येशी संबंधित अन्य एकजण हाती लागला नसून पोलीस त्याचाही कसोशीने शोध घेत आहेत. कालुकुमार सिताराम महतो (वय, 25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लालूकुमार सिताराम महंतो असे फरार आरोपीचे नाव आहे. तर पुरण सिकंदर महतो (वय 47, रा. डोंबिवली गोळवली, मुळ रा. झारखंड राज्य) असे दगडाने ठेचून हत्या झालेल्या चुलत भावाचे नाव आहे.

एसीपी जे. डी. मोरे यांची प्रतिक्रिया

झारखंडमध्ये झालेल्या हाणामारीचा बदला डोंबिवलीत -

कल्याण-शिळ मार्गावरील गोळवली गावातल्या दर्शन पाटील चाळीजवळ एक इसम जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती नियंत्रण कक्षातून गुरुवारी 4 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास मानपाडा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी गेले असता, एक इसम रस्त्यावर रक्तबंभाळ बेशुध्दावस्थेत पडलेला होता. त्याच्या डोक्यास दुखापत झालेली होती. त्यानंतर पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमा गंभीर स्वरुपाने पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. तर दुसरीकडे घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन स्थानिक लोकांकडे विचारपुस करुन जखमीची ओळख पटवली. त्यावेळी जखमीचे नाव पुरण सिकंदर महतो असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनतर पोलिसांनी जखमी पुरणच्या संबंधित त्याच्या गावाकडील राहणाऱ्या लोकांकडे सखोल चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान पोलिसांना जखमी पुरणच्या गावाकडील एकाने दिलेल्या माहितीनुसार पुरण व त्याचे चुलत भाऊ हे डोंबिवली पूर्वेतील गोळवलीमध्ये वेगवेगळे राहतात. त्यांच्यात गावाकडील संपत्तीवरून वाद असून त्याबाबत त्यांच्यावर जीवघेणी हाणामारी केल्याप्रकरणी झारखंड मधील एका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मूळ गावी झालेल्या हाणामारीचा राग डोंबिवलीत काढल्याचे पोलीस तपासात समोर आले.

हल्लेखोर पळून गेले होते झारखंडला -

बुधवारी 3 नोव्हेंबर रोजी रात्री चुलत भावांनी मृतक पुरणला जेवण करण्यासाठी घरी बोलावले. तेथे त्याला दारू पाजण्यात आली. त्यानंतर गावाकडील संपत्तीच्या वादातून त्याच्याशी भांडण उकरून काढले. त्यानंतर दोघा चुलत भावांनी मिळून त्याला जबर मारहाण तर केलीच, शिवाय त्याच्या डोक्यात दगड घालून दोघांनी तेथून पळ काढला होता. दुसरीकडे जखमी अवस्थेत पुरणला मुंबईतील सायन हॉस्पीटलमध्ये हलवले. तेथे त्याचा उपचारादरम्यान सोमवारी 8 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. मानपाडा पोलिसांनी भादंवि 302 चे वाढीव कलम लावून तपास सुरू केला. या हत्येशी संबंधित कालूकुमार आणि त्याचा भाऊ लालूकुमार सिताराम महंतो यांचा सर्वोतोपरी शोध घेण्यात येत होता. तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपींचा म्हारळ, शहाड, सुरत, अंकलेश्वर, भरूच, भुसावळ या ठिकाणी पथके पाठवून शोध घेतला. परंतु हल्लेखोर त्यांच्या मुळगावी झारखंड राज्यात पसार झाल्याची माहिती प्राप्त झाली.

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला -

आरोपी त्यांच्या गावाकडे पळाल्याची माहिती कळताच सपोनि अविनाश वणवे यांच्यासह राजेंद्र खिलारे, भानुदास काटकर, विजय कोळी, प्रवीण किनरे, भारत कांदळकर या पोलीस पथकाने झारखंडमध्ये जाऊन शोध मोहीम सुरू केली. आरोपी त्यांच्या मुळगांवातच लपल्याची माहिती कळताच या पथकाने स्थानिक पोलिसांच्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या मुळगांवाकडे धाव घेतली. मात्र पोलिसांना पाहताच गावकरी प्रक्षुब्ध झाले. आरोपीला सोबत घेऊन जाण्यास विरोध करण्यासाठी या गावकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. परंतु, गावकऱ्यांच्या विरोधास न जुमानता पोलिसांनी आरोपी कालूकुमार महंतो यास ताब्यात घेतले. असून कल्याण कोर्टाने त्याला अधिक चौकशीकरिता 22 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा - Waiter commits suicide : 'फेसबुक लाइव्ह' करून तेराव्या मजल्यावरून उडी मारून वेटरची आत्महत्या

Last Updated :Nov 20, 2021, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.