ETV Bharat / state

Waiter commits suicide : 'फेसबुक लाइव्ह' करून तेराव्या मजल्यावरून उडी मारून वेटरची आत्महत्या

author img

By

Published : Nov 20, 2021, 4:15 PM IST

'फेसबुक लाइव्ह' (FB LIVE) करून तेराव्या मजल्यावरून उडी मारून वेटरने आत्महत्या (Waiter commits suicide ) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी हॉटेल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंदसिंह राठोड (Arvind Singh Rathod) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

pune crime news
वेटरची आत्महत्या

पुणे - मुंढवा परिसरातील हॉटेल 'पेंटहाऊस'च्या तेराव्या मजल्यावरून उडी मारून वेटरने आत्महत्या (Waiter commits suicide) केल्याची घटना उघडकीस आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी वेटरने 'फेसबुक लाइव्ह' (FB LIVE) करून आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते.

हॉटेल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल -

अरविंदसिंह राठोड (Arvind Singh Rathod) (वय २६, रा. सनेती, उत्तराखंड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या हॉटेलमध्ये मागील सुमारे एक महिन्यापासून तो वेटर म्हणून काम होता. याप्रकरणी हॉटेल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काशी घडली घटना -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अरविंदसिंग हा मुळचा उत्तराखंडचा राहणारा आहे. मुंढवा परिसरातील एबीसी रोडवरील हॉटेल पेंट हाऊसमध्ये तो वेटर म्हणून एक महिन्यांपूर्वीच कामाला आला होता. बुधवारी रात्री 9 वाजता तो हॉटेलच्या टेरेसवर 13 व्या मजल्यावर गेला. तेथे उभा राहून त्याने व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. त्यात त्याने आपण आत्महत्या करणार असल्याचे म्हटले. यावेळी त्याने हॉटेलमधील काही लोकांवर आरोप करीत त्यांनी आपले वाईट केले असून फसवून काही कामे करुन घेतल्याचे म्हटले आहे. तो टेरेसवर उभा असल्याचे पाहून काही जणांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने काही क्षणातच खाली उडी घेतली. याबाबत तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवडी यांनी दिली.

मृत्यूपूर्वी 'फेसबुक लाइव्ह' -

आत्महत्या करण्यापूर्वी राठोड याने 'फेसबुक लाइव्ह' करून आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. हॉटेलमधील काही लोकांनी फसविले असून, कामे करून घेतल्याचे त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता त्याने आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा - नागपुरात महिला पोलीस शिपायाची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.