ETV Bharat / state

सायकलवरून जाताना विजेच्या तारेच्या धक्क्याने शेतकरी जागीच ठार

author img

By

Published : Oct 1, 2022, 9:46 PM IST

सायकलवरून जाताना विज तारेच्या धक्क्याने शेतकरी जागीच ठार
सायकलवरून जाताना विज तारेच्या धक्क्याने शेतकरी जागीच ठार

शेतकरी ताजुद्दिन मुहमद मुल्ला हे पहाटे सायकल वरून आपल्या शेतात जनावरांच्या धारा काढण्यासाठी सायकलीवरून शेतात जात होते. याचवेळी उच्च दाबाची 11 केवी असणारी विद्यूत वाहिनी तुटून रस्त्यावर पडलेली होती. मात्र सायकल वरून जाणाऱ्या मुल्ला यांना ही तार दिसलीच नाही.या तारेला सायकलचा स्पर्श होताच, त्यांनी विजेचा जबरदस्त धक्का बसून ते खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सांगली - रस्त्यावर तुटून पडलेल्या विजेच्या ताराचा धक्का बसून एक शेतकरी जागीचं ठार झाल्याची घटना घडली.पलूस तालुक्यातील बांबवडे या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली.सायकलवरून शेताकडे जात असताना रस्त्यावर पडलेल्या विजेच्या ताराचा धक्का बसल्याने हा अपघात झाला.

तब्बल अडीच तास विद्यूत प्रवाह सुरू पलूस तालुक्यातील बांबवडे येथील शेतकरी ताजुद्दिन मुहमद मुल्ला हे पहाटे सायकल वरून आपल्या शेतात जनावरांच्या धारा काढण्यासाठी सायकलीवरून शेतात जात होते. याचवेळी उच्च दाबाची 11 केवी असणारी विद्यूत वाहिनी तुटून रस्त्यावर पडलेली होती. मात्र सायकल वरून जाणाऱ्या मुल्ला यांना ही तार दिसलीच नाही.या तारेला सायकलचा स्पर्श होताच, त्यांनी विजेचा जबरदस्त धक्का बसून ते खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना उठल्यापासून तब्बल अडीच तास विद्यूत प्रवाह तसाच सुरू होता. महावितरण अधिकारी फोन उचलत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. तसेच एवढ्या उच्च दाबाच्या वाहिनीला खालून कसलेही गार्डींग नव्हते.वारंवार सांगूनही महावितरण ने दाद न घेतल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.