ETV Bharat / state

'बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना घराबाहेर काढलं असतं'; रामदास आठवले 'बरसले' - Ramdas Athawale on Uddhav Thackeray

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 9:52 AM IST

Ramdas Athawale on Uddhav Thackeray : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. "आज बाळासाहेब ठाकरे हे हयात असते, तर त्यांनी उद्धव ठाकरेंना घराबाहेर काढलं असतं," अशी टीका त्यांनी यावेळी केली.

Ramdas Athawale on Uddhav Thackeray
केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Reporter)

मुंबई Ramdas Athawale on Uddhav Thackeray : संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार करणारी काँग्रेस स्वतः धोक्यात आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. सोबतच "बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसच्या विरोध केला, त्याच काँग्रेस सोबतच आज उद्धव ठाकरे गेले आहेत. आज बाळासाहेब हयात असते, तर त्यांनी उद्धव ठाकरेंना घराबाहेर काढलं असतं" अशी जोरदार टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. बुधवारी सायंकाळी बरकत अली नाका, वडाळा इथं महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. या सभेत विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, अभिनेता गोविंदा आदी उपस्थित होते.

फोडा आणि राज्य करा ही काँग्रेसची नीती : महायुतीच्या प्रचार सभेत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, "काँग्रेसनं नेहमीच फोडा आणि राज्य करा ही नीती वापरुन राज्य केलं. आजही संविधान धोक्यात आहे, असा अपप्रचार करुन काँग्रेस मागासवर्गीय आणि मुस्लिमांना घाबरवत आहे. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसच धोक्यात आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसवर टीका केली, त्याच काँग्रेससोबत आज उद्धव ठाकरे गेले आहेत. त्यामुळे आज बाळासाहेब हयात असते, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना घराबाहेर काढलं असतं," अशी टीकाही रामदास आठवले यांनी केली. महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा राहुल शेवाळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असं आवाहनही यावेळी आठवले यांनी केलं.

गोविंदानं केलं राहुल शेवाळेंच्या कार्याचं कौतुक : सिने अभिनेता गोविंदा यानं आपल्या भाषणात राहुल शेवाळे यांच्या कार्याचं कौतुक केलं. यावेळी गोविंदानं राहुल शेवाळे यांना विजयी करण्याचं जनतेला आवाहन केलं. महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आपल्या भाषणात मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांसाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती जनतेसमोर मांडली. कोरबा मिठागर परिसरातील पुनर्विकास हा राज्य सरकारतर्फे केला जाणार आहे. त्यासाठी धोरण निश्चिती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सोबतच दादर टर्मिनसला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देणार असल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी वडाळा येथील सभेत दिली.

हेही वाचा :

  1. "नरेंद्र मोदी है चमकता तारा और चुनाव मे हम राहुल गांधी के..."; रामदास आठवलेंची त्यांच्या शैलीत कविता, उपस्थितांमध्ये 'हास्यकल्लोळ' - Ramdas Athawale Poem
  2. भाजपाची ऑफर असती तरी कमळ चिन्हावर निवडणूक लढलो नसतो - रामदास आठवले - Ramdas Athawale About BJP
  3. काश्मीरमधील गोरगरीबांना आरक्षणाचा फायदा होईल; रामदास आठवलेंनी सांगितलं 'हे' कारण - Ramdas Athawale
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.