ETV Bharat / politics

काश्मीरमधील गोरगरीबांना आरक्षणाचा फायदा होईल; रामदास आठवलेंनी सांगितलं 'हे' कारण - Ramdas Athawale

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 8:50 AM IST

Updated : Apr 22, 2024, 10:49 AM IST

Ramdas Athawale
राजकारणात तडजोड करावी लागते, ती कशी करावी हे माझ्याकडून शिकावं - रामदास आठवले

Ramdas Athawale : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगरात पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांवर टीका केलीय.

रामदास आठवले

छत्रपती संभाजीनगर Ramdas Athawale : सध्या देशात लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवायला सर्व विरोधक एकवटले असले, तरी देशात एनडीए 370 जागा जिंकणार, महाराष्ट्र राज्यात 40 पेक्षा जास्त जागा येतील," असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) अध्यक्ष तथा केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत व्यक्त केला. रामदास आठवले रविवारी शहरात पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काश्मीरचं 370 कलम हटवलं त्याचा फायदा झाला. दहशतवाद 90 टक्क्यांनी कमी झाला. तसंच आता " संविधान काश्मीरमध्ये लागू झाल्यानं तेथील मागासवर्गीयांना, गोर गरीबांना आरक्षणाचा फायदा होईल," असं रामदास आठवले यांनी म्हणाले. यावेळी त्यांनी शीघ्र कविता केल्यामुळे पत्रकार परिषदेत मोठा हास्यकल्लोळ झाला.



आठवलेंची कवितेतून स्तुती सुमनं : यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत कविता सादर केली. "चारसौ पार है नरेंद्र मोदी का नारा, इसलिए मै जगा रहा हू भारत सारा, आज देशमे जो सब नेता है उसमे नरेंद्र मोदी है चमकने वाला तारा, और २०२४ लोकसभा चुनाव मे हम राहुल गांधी के बजा देंगे बारा." ही शीघ्र कविता त्यांनी राहुल गांधी यांच्या निवडणूक अभियानावर केली.

राजकारणात तडजोड करावी लागते : आपल्या पक्षाला एकही जागा दिली नाही, कार्यकर्त्यात नाराजी नाही का ? या प्रश्नावर बोलताना आठवले म्हणाले, "माझी इच्छा होती की मला शिर्डीची जागा मिळावी. मात्र, एकनाथ शिंदे आणि सदाशिव लोखंडे ऐकायला तयार नव्हते. तर मग मी पण का ऐकायला पाहिजे ? एक मंत्री पद, एक विधान परिषद, आगामी निवडणुकांत संधी देण्यात यावी, महामंडळात आम्हाला संधी देण्याची मागणी केली असता आश्वासन दिल्या नंतर आम्ही पाठिंबा दिला. पंतप्रधान मोदींचा मला फोन आला ते म्हणाले आपल्याला 400 पार जायचंय. राजकारणात तडजोड करावी लागते, तडजोडीचे फायदे होत असतील तर करावी. मी नाराज होतो, मात्र आता नाराज नाही. आजच्या राजकारण्यांनी तडजोड कशी करावी हे माझ्याकडून शिकावं," अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.


राहुल गांधी यांची भारत तोडो यात्रा : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नाही तर भारत तोडो यात्रा आहे. लोकशाही धोक्यात असती तर मोदी कशाला मत मागायला गेले असते. संविधान कुणी बदलू शकत नाही. अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मतान पडलं होतं, ही एका मताची किंमत आहे. ही संविधानाची ताकद आहे, असं मत मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर संविधान बदलतील, या विरोधकांच्या आरोपावर बोलताना रामदास आठवले यांनी मांडलं. आम्ही मोदींची स्तुती करत नाही आम्ही सरकारची स्तुती करतो, सरकारनं कुठलाही जाती धर्म भेदभाव न करता सबका साथ सबका विकास केला, असंही रामदास आठवले म्हणाले.

हेही वाचा :

  1. नार्वेकर यांच्याशी संपर्क नाही, मात्र आले तर स्वागतच करू, शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य - Lok Sabha Election 2024
  2. "मी फोकनाड लिडर नाही, आश्वासनं दिली ते पूर्ण करतो" - नितीन गडकरी - Nitin Gadkari
Last Updated :Apr 22, 2024, 10:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.