ETV Bharat / state

न्या. शिंदे समितीच्या आढावा बैठकीत कुणबी नोंदींच्या पुराव्याबाबत सविस्तर चर्चा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 9:12 PM IST

Maratha Reservation : माजी न्यायमूर्ती शिंदे समितीच्या आढावा बैठकीत जात नोंदीच्या पुराव्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आलीय. या बैठकीत पुरातत्व विभागातील नोंदी तपासण्याच्या सूचना देखील न्या. शिंदे यांनी सदस्यांना दिल्या. तसंच त्यांनी समीतीनं केलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केलंय.

Maratha Reservation
Maratha Reservation

पुणे Maratha Reservation : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. जात प्रमाणपत्र विहित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्या. शिंदे समितीची आज विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत 'मराठा कुणबी, कुणबी मराठा' या जातीच्या नोंदींचा भक्कम पुरावा असलेल्या कागदपत्रवर सविस्तर चर्चा करण्यात आलीय.

पुरातत्व विभागाच्या नोंदी तपासाण्याच्या सूचना : विविध जिल्ह्यांच्या तसंच संस्थांच्या नोंदी तपासताना काही नोंदी पुरातत्व विभागाकडंही उपलब्ध आहेत. या नोंदी तपासण्यासाठी अधिक कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं पुरात्व विभागातील नोंदी देखील तपासण्याचं काम सुरू ठेवण्याच्या सूचना शिंदे समितीनं संबंधितांना दिल्या आहेत. त्यामुळं पुरातत्व विभागाकडं आणखी नोंदी सापडण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे.

शिंदे समितीनं घेतला आढावा : यावेळी कुणबी नोंदी तपासण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये समितीचं काम जोरात सुरू आहे. त्यामुळं आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा न्यायमूर्ती शिंदे समितीनं आज पुण्यात घेतला. 'पुरातत्त्व विभागाच्या नोंदीसह कुणबी नोंदी तपासण्याचं काम सुरू ठेवा', अशा सूचना देखील निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांनी समितीला दिल्या आहेत. त्याचबरोबर पुणे विभागाच्या कामाबाबतही त्यांनी समाधान व्यक्त करत वेळेत नोंदी तपासण्याचं काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

समितीच्या कामावर शिंदेंचं समाधान : बैठकीच्या सुरुवातीलाच समितीचे अध्यक्ष तसंच सदस्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी विभागात आतापर्यंत पडताळणी केलेल्या कागदपत्राची माहिती समीतीसमोर ठेवली. त्यानंतर विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रेझेंटेशनद्वारे केलेल्या कामाची माहिती समितीला दिली. त्यामुळं समितीच्या कामावर न्यायमूर्ती शिंदे यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त), विभागीय आयुक्त सौरभ राव, उपायुक्त वर्षा लड्डा, विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, महापालिकेतील अधिकारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. ओबीसी मराठा आरक्षण वाद ; तर मराठा शिल्लक राहणार नाही, छगन भुजबळ यांचा पुन्हा हल्लाबोल
  2. मराठा आंदोलकांचा विरोध; अजित पवारांचा संभाजीनगर दौरा रद्द होण्यामागचं खरं कारण काय?
  3. मराठा आरक्षण : मनोज जरांगे यांचा फोटो छापलेल्या टी शर्टची वाढली मागणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.