ETV Bharat / state

ओबीसी मराठा आरक्षण वाद ; तर मराठा शिल्लक राहणार नाही, छगन भुजबळ यांचा पुन्हा हल्लाबोल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 2:47 PM IST

Updated : Dec 6, 2023, 3:24 PM IST

OBC vs Maratha Reservation : मराठा आंदोलनानंतर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. त्यामुळे सगळ्यांनीच मराठा प्रमाणपत्र घेतले, तर मराठा शिल्लक राहणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. (Chhagan Bhujbal In Nagpur )

OBC vs Maratha Reservation
मंत्री छगन भुजबळ

मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याविषयी छगन भुजबळ

नागपूर OBC vs Maratha Reservation : राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन मोठा वाद सुरू आहे. यातच मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात नवीन वाद पेटला. (Marathas Will Not Remain ) आता मंत्री छगन भुजबळ यांनी नवा दावा केला आहे. (Chhagan Bhujbal On Maratha Reservation) सगळेच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत, त्यामुळे मराठा शिल्लक राहणार नाहीत, असा दावा छगन भुजबळ यांनी आज नागपुरात केला. त्यामुळे आता पुन्हा छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक हा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Kunbi certificate for Marathas)

काय म्हणाले छगन भुजबळ : "मला वाटतं काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही, मराठा शिल्लक राहणार नाही. सर्वच मराठा कुणबीचे प्रमाणपत्र घेत आहेत, हेच चाललेलं आहे. आयोगाचे लोक राजीनामे देत आहेत. ओबीसी आयोग राहिला नाही तर मराठा आयोग राहिला आहे" असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. "सर्व मराठा ओबीसीमध्ये येऊ घातले आहेत. त्यामुळे आता काहीही करण्याची गरज नाही. जरांगे पाटलांच्या मनाप्रमाणं सर्व गोष्टी घडवल्या जात आहेत. ओबीसीमध्ये फूट पाडली जात आहे" असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला आहे.

ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न : "हरिभाऊ राठोड ओबीसीमध्ये फूट पाडण्याची गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहेत" असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला आहे. मराठा आंदोलनामुळे आता ओबीसी नेत्यातील वाद पुन्हा अधोरेखित झाला आहे. ओबीसी नेत्यांमध्ये फूट पाडत असल्याचा वारंवार आरोप होत आहे.

त्यांनी अ ब क ड चा अभ्यास करावा: मी अ ब क ड चा अभ्यास केला आहे. अ ब क ड प्रमाणे अगोदरच आरक्षण मिळालेलं आहे. हरिभाऊ राठोड ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनीच अ ब कडचा अभ्यास करावा, असा सल्ला मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

कुणबी प्रमाणपत्र द्यावच लागेल - मनोज जरांगे: मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी 27 सप्टेंबर, 2023 रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेत सरकारला आरक्षणाविषयी एक इशारा दिला होता. मराठा समाज हा आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा; पण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र हे सरकारला द्यावेच लागेल, असा इशारासुद्धा यावेळी जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये शासनाला दिला होता.

हेही वाचा :

  1. आमच्याशी दगाफटका करु नका नाहीतर जड जाईल; मनोज जरांगे पाटलांचा इशारा
  2. मी धमक्यांना घाबरत नाही, मला कोणी गावबंदी करू शकत नाही; मंत्री छगन भुजबळांची आक्रमक भूमिका
  3. 'जो महापुरूषांची जात काढतो त्याच्याबद्ल बोलायचं नाही', जरांगेंची भुजबळांवर अप्रत्यक्ष टीका
Last Updated :Dec 6, 2023, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.