ETV Bharat / state

Pune Crime: अनैतिक संबंधाचा संशय; महिलेसह दोन मुलांचा खून करुन जिवंत जाळले

author img

By

Published : Apr 6, 2023, 1:41 PM IST

Updated : Apr 6, 2023, 5:28 PM IST

Pune Crime
महिलेसह तिच्या दोन मुलांना जिवंत जाळले

पुणे शहरातील कोंढवा परिसरातील पिसोळी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. महिलेसह दोन लहान मुलांचा खून करून नराधमाने नंतर पत्र्याच्या शेडमध्ये तीघांनाही जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणे: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये वाढ होताना पहायला मिळत आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या पिसोळी येथे असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नात्यातच असलेल्या एकाने महीलेसह तीच्या दोन मुलांचा खून करुन जाळले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा महिलेचा जवळचा नातेवाईक आहे. त्याने अनैतिक संबंधाच्या संशयावरुन हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.



दोन मुलांचा खून: समीर साहेबराव मासाळ 34 वर्ष राहणार पिसोळी यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार. वैभव वाघमारे या आरोपीस पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी हा लातूर जिल्ह्यातील राहिवासी आहे. तर आम्रपाली वाघमारे आणि मुले रोशनी आणि आदित्य अशी खून झालेल्या तिघांची नावे आहेत. आरोपी वैभव हा गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा रक्षकाचे काम करत असल्याची माहितीही समोर येत आहे.



पत्र्याच्या शेडमध्ये जाळले मृतदेह : आरोपी वैभव वाघमारे ( 30 ) वर्ष राहणार मुक्काम पो. लोटा ता. औसा जि. लातूर हा. त्याच्या नात्यातील महिला आम्रपाली ( 25 ) वर्ष हीला तिचे दुसऱ्या पुरुषांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून वाद घालायचा. तीच्यावर तो सतत आरोप करत भांडायचा अशाच भांडणात त्याने अखेर रागाच्या भरात आम्रपाली वाघमारे हिचा व तिची लहान मुलगी रोशनी वय सहा वर्ष आणि मुलगा आदित्य वय चार वर्ष यांचा आधी खून केला. त्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी नंतर त्याने या तीघांचेही मृतदेह खोलीच्या समोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन जाळले. यासाठी त्याने घरातील कपडे बेडशीट व लाकडे आदींचा वापर केला. अशी माहिती समोर येत आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहे.

हेही वाचा: Riots Plan in Pune विवादित पोस्ट टाकून त्याला घडवायची होती दंगल अल्पवयीन बालकाला अटक

Last Updated :Apr 6, 2023, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.