ETV Bharat / state

Illegal Liquor Stock : सांगितली औषधे अन् निघाला मद्यसाठा; ट्रकमधून 57 लाखांचा मुद्देमाल जप्त

author img

By

Published : Apr 25, 2023, 4:37 PM IST

Illegal Liquor Stock Seized In Pune
अवैध मद्यसाठा जप्त

पुणे जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने औषधांच्या नावाआड होणाऱ्या मद्याच्या अवैध वाहतुकीचा भंडाफोड केला आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुळशी तालुक्यातील मौजे माले गावच्या हद्दीत पुणे-माणगाव महामार्गावर धडक कारवाई करत तब्बल 57 लाख 25 हजार 520 रुपयांचे बेकायदेशीर मद्य जप्त केले आहे. या प्रकरणी दानाराम चुनाराम नेहरा, रुखमनाराम खेताराम गोदरा या दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम तसेच अन्य कलमांअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या मद्यासाठ्याविषयी सांगताना अधिकारी

पुणे: राज्य उत्पादन शुल्क यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग, पुणे या पथकाने गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या मद्यावर धडक कारवाई केली. गोवा राज्य निर्मित मद्याची अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर आवक केली जाते. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणे या पथकाने मोहीम राबविली. दरम्यान पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मौजे माले गावच्या हद्दीत हॉटेल लाल मिर्चच्या समोर पुणे-माणगाव हायवे रोडवर संशयित ट्रकांची तपासणी सुरू केली. यावेळी वाहन क्र. एमएच. ०४ ईएल. ४८४७ या ट्रकमधील मालावर अधिकाऱ्यांना संशय आला. संबंधित ट्रकचालकास याविषयी विचारले असता त्याने ट्रकमध्ये औषधे व इंजक्शन असल्याचे सांगितले; परंतु त्याने संशयित उत्तरे दिल्याने ट्रक बाजूला थांबवून कठोर तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनामध्ये औषधांऐवजी बेकायदेशीर मद्यसाठा असल्याचे आढळून आले.

Illegal Liquor Stock Seized In Pune
जप्त करण्यात आलेला मद्यसाठी आणि ट्रक

57 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त: या कारवाईत वाहनामध्ये गोवा राज्य निर्मित व विक्रीसाठी असलेल्या विविध कंपन्यांच्या सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. मुद्देमालाची एकूण किंमत ५७ लाख २५ हजार ५२० रुपये आहे. उल्लेखनीय म्हणजे, वाहन चालकाकडे मद्य वास्तुकेच्या संदर्भातील कोणताही वाहतुक पास, परवाने अथवा कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत. या कारवाईने मद्यमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

अवैध दारूसाठा जप्त: लातूर तालुक्यातील उदगीर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने डिसेंबर, 2019 मध्ये दोन लाखांचा अवैध दारूसाठा जप्त केला होता. या कारवाईत अवैध दारूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या टेम्पोसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

अशी केली कारवाई: व्यंकटराव पाटील हे टम्पोतून अवैध दारूची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एम.एच.१३ सी.यु.०४२८ या वाहनाचा पाठलाग करत देवर्जन-हनुमंतवाडी पाटी परिसरात हा दारुसाठा जप्त केला. सुरुवातीला पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली. मात्र, या प्रकरणाचा तालुक्यात गाजावाजा होताच पोलिसांना कारवाई करावी लागली. परिसरात पोलिसांच्या या अजब वर्तणुकीची चर्चा सुरू आहे. मारोती घोडके यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा: Vajramuth Sabha : महाविकास आघाडीची पुण्यातील वज्रमूठ सभेचा मुहूर्त चुकणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.