ETV Bharat / state

भाच्यासाठी मामा झाला कंस! मामानेच केली भाच्याची हत्या

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 31, 2023, 10:31 PM IST

Palghar Crime News : मामानेच भाच्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर येथे घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Palghar Crime News
मामानेच केली भाच्याची हत्या

पालघर Palghar Crime News : किरकोळ कारणावरून झालेल्या वादात मामाने भाच्याचा खून केल्याची घटना तलासरी तालुक्यातील झरी पोंढापाड़ा येथे घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मुलगा, पुतण्या आणि भाच्यामध्ये किरकोळ वाद होता. या वादातून चुलत मामाने भाच्याचा खून केला. यातील मुख्य आरोपीने यापूर्वी आपल्या पत्नीचा खून केला होता. त्यामुळं त्याला तुरुंगवास भोगाव लागला होता. तलासरी तालुक्यातील झरी पोंढापाड़ा येथील देवराम जवलिया (30 ) हा आपल्या वडिलांसह मुंबई येथे मासेमारी बोटीवर काम करत होता. काही दिवसांसाठी तो आपल्या घरी आला होता.

हत्येतील मुख्य आरोपी चंदू खरपड़े अट्टल गुन्हेगार असून यापूर्वी पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली त्यांने जेल भोगली आहे. सदर आरोपी हा भाच्याची हत्या करून फरार झाला होता. पण विविध पथकाद्वारे याचा शोध घेत त्याला अटक करण्यात आली आहे. दोन आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली होती. दरम्यान यातील तीनही आरोपीना अटक करण्यात आली आहे - विजय मूतडक, पोलिस निरीक्षक तलासरी पोलिस ठाणे

तिघांमध्ये झाला किरकोळ वाद : देवराम जवलिया चुलत मामाची मुले प्रदीप खरपडे (वय 31) आणि विकास खरपडे (वय २3) यांच्यासह तो घरातून बाहेर गेला होता. रात्री आठ वाजता घरी परतल्यानंतर त्याने देवराम वाहन जोरात चालवण्याच्या मुद्द्यावरून तिघांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यात झटापट झाली. दरम्यान, प्रदीपचे वडील आणि देवराम याचे चुलत मामा चंदू खरपडे (वय 53) याने मागून येऊन देवरामच्या मानेवर वार केले. आरडाओरडा सुरू झाल्यानंतर परिसरातील लोक जमा झाले. त्याला तलासरी येथील रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारापूर्वीच देवरामचे निधन झाले. या प्रकरणी तलासरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रात्री उशिरा जंगलात पळून गेलेल्या चंदू खरपडे या सराईत गुन्हेगारासह तिघांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, त्यांना न्यायालयासमोर उभे केलं असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. Palghar Crime : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आठ तरुणांना अटक
  2. Palghar Crime News : अल्पवयीन तरुणीने रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट, व्हॉइस नोट पाठवून केली कुटुंबियांची दिशाभूल
  3. Palghar crime news: वडिलांनी लैंगिक शोषण केल्याची तक्रार करत किशोरवयीन मुलीची आत्महत्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.