ETV Bharat / state

Palghar Crime : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आठ तरुणांना अटक

author img

By

Published : Dec 18, 2022, 11:03 AM IST

Updated : Dec 18, 2022, 3:15 PM IST

पालघर तालुक्याती सातपाटी सागरी ( Satpati Police ) पोलीस ठाणे अंतर्गत ठिकाणी सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणीवर ( rape on minor girl ) सामूहिक बलात्कार झाला आहे. या आरोपींना अटक झाली आहे.

पालघर
पालघर

पालघर- सामूहिक बलात्काराची घटना जिल्ह्यात घडली ( Palghar crime news ) आहे. पालघर तालुक्यातील माहीम येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलींवर 8 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 8 तरुणांना सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली ( gang rape of a minor girl in Palghar) आहे.

पालघर तालुक्यातील सातपाटी सागरी ( Satpati Police ) पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या माहीम चौकी दुरक्षेत्रातील पालघर- माहीम रस्त्यावरील पाणेरी नदीजवळ एका निर्जन ठिकाणी हा गुन्हा घडला आहे. माहीम येथे राहणाऱ्या एका सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. काही तरुणांनी जबरदस्तीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची बाब समोर आली आहे.

अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार

आरोपी तरुणापैकी अनेक तरुण हे गर्दच्या आहारी गेल्याची माहितीही समोर येत आहे. या मुलीने माहीम पोलीस चौकी गाठत या तरुणांविरुद्ध तक्रार दाखल केली. सातपाटी सागरी पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. सामूहिक बलात्कार करणारी ही मुले माहीम,हनुमान पाडा, टेंभी,सफाळे,वडराई भागातील असल्याची माहिती समोर आली आहे.

अल्पवयीन मुलीवर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू दरम्यान सदर अल्पवयीन मुलीवर माहीम येथील समुद्रकिनाऱ्यावरील बंगल्यात तसेच समुद्र किनारी असलेल्या झाडीमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचे उघड झाले. आठही आरोपींना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सध्या अल्पवयीन मुलीवर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी सांगितले. आरोपींना आज पालघर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अधिक तपास पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातपाटी सागरी पोलीस करीत आहेत.

Last Updated : Dec 18, 2022, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.