ETV Bharat / state

Palghar Crime News : अल्पवयीन तरुणीने रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट, व्हॉइस नोट पाठवून केली कुटुंबियांची दिशाभूल

author img

By

Published : Jun 18, 2023, 4:31 PM IST

विरारमध्ये एका अल्पवयीन तरुणीने स्वतःच्याच अपहरणाचा कट रचून कुटुंबियांची दिशाभूल केल्याची घटना घडली आहे. या तरुणीने कुटुंबियांना व्हाईस नोट पाठवून आपले अपहरण झाल्याचे सांगितले, मात्र पोलीस तपासात ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे समोर आले.

Palghar Crime
पालघर क्राईम

विरार (पालघर) : विरार येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीने आपले अपहरण झाल्याची व्हाईस नोट कुटुंबीयांना पाठवल्यामुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी कुटुंबाने अर्नाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल केला गेला. मात्र पोलीस तपासा दरम्यान तिचे अपहरण झालेले नसून, तिने अपहरणाचा बनाव केल्याचे उघड झाले. या प्रकरणी आता अर्नाळा पोलीस पुढील तपास करत आहेत.

मुलीने अपहरण झाल्याची व्हाईस नोट पाठवली : ही अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे कामावर जाते असे सांगून घरातून गेली होती. मात्र ती कामावर गेलीच नाही. मुलगी रात्री उशीर झाला तरीही घरी न परतल्याने कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर या तरुणीने आपल्या भावाच्या मोबाईलवर व्हाट्सॲपद्वारे रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास एक व्हॉइस नोट पाठवली. माझे एका व्यक्तीने अपहरण केले असून तो ट्रेन मधून मला अज्ञात स्थळी घेऊन जात असल्याचे तिने या व्हॉइस नोटमध्ये सांगितले. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने अर्नाळा सागरी पोलीस ठाणे गाठले आणि मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली.

मुलगी कोलकात्याला पळून गेली : अर्नाळा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र तपासानंतर ही तरुणी विमानाने आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे उघडकीस आले. या मुलीने स्वत:च स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला होता. तरुणी सध्या सुखरूप असून ती तिच्या ओळखीच्याच एका व्यक्तीसोबत कोलकाता येथे गेली आहे. अर्नाळा पोलिसांचे एक पथक तिला ताब्यात घेण्यासाठी कोलकात्याला रवाना झाले असल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली आहे.

हे ही वाचा :

  1. Mumbai Crime News: पब्जीच्या मैत्रीमुळे प्रियकर तुरुंगात; बनावट इंस्टाग्राम आयडी बनवून मुलींना प्रेमात अडकवायचा, नकार दिल्यावर करायचा बदनामी
  2. Mobile Thief Arrested: इराणी गँगच्या २४ वर्षीय म्होरक्यांवर २१ गुन्हे, मोबाईल चोरीच्या आरोपात सापळा रचून अटक
  3. UP Crime News : भुतांचा छडा लावणारा पोलीस अधिकारीच निघाला दरोडेखोर, गुजराती व्यावसायिकांकडून उकाळले 1.4 कोटी; 7 पोलीस कर्मचारी निलंबित
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.