ETV Bharat / state

महायुतीच्या मेळाव्याकडे बहुजन विकास आघाडीची दुसऱ्यांदा पाठ; रिकाम्या खुर्च्यांमुळे सभा ओस

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 10:44 PM IST

Mahayuti Meeting In Palghar: राज्यात सर्व ठिकाणी आज महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी १५ घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील, (Mahayuti Melava) असे गेल्या दोन दिवसांपूर्वीच्या पालघर येथील पत्रकार परिषदेत सांगण्यात आले होते; परंतु त्या पत्रकार परिषदेला ही बहुजन विकास आघाडीचे कुणीही उपस्थित नव्हते. पालघर येथील आजच्या मेळाव्याकडेही बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. (Lok Sabha Election 2024)

Bahujan Vikas Aghadi
रिकाम्या खुर्च्यांमुळे सभा ओस

महायुतीच्या सभेनंतर खासदार राजेंद्र गावित माध्यमांशी बोलताना

पालघर Mahayuti Meeting In Palghar: येथे आज आयोजित महायुतीच्या सभेला बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी दांडी मारली. त्यामुळे महायुतीतील एकजुटीचा फोलपणा स्पष्ट दिसून येत होता. बहुजन विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात राहिल्यास महायुतीचं नुकसान असल्याची चर्चा सुरू आहे. (MP Shrikant Shinde) हा मतदारसंघ शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडे असून येथे बहुजन विकास आघाडीची मते अधिक आहेत. येथून बहुजन विकास आघाडीचा उमेदवार रिंगणात उभा राहतो की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. बहुजन विकास आघाडी रिंगणात राहिल्यास महायुतीचं नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीची समजूत कशी काढायची, असा प्रश्न आहे. (MP Rajendra Gavit)

Mahayuti Melava
सभेतील रिकाम्या खुर्च्यांनी वेधले लक्ष

खासदार शिंदे-राणे यांची विधाने परस्परविरोधी: शिवसेनेच्या शिंदे गटाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याचा आहे. येथून पुन्हा खासदार राजेंद्र गावित यांनाच उमेदवारी मिळणार असून ते धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मात्र या मतदारसंघातून भाजपाचाच खासदार होईल, असा दावा केला. पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार कोण? याबाबतचा संभ्रम कार्यकर्ते आणि जनतेच्या मनात अजूनही कायम आहे. महायुतीने उशिरा उमेदवार दिला तर तो जनतेला पसंत पडेल का? याबाबतही साशंकता आहे. त्यातच महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेला बहुजन विकास आघाडी अजूनही महायुतीपासून फटकून राहत असल्यानं महायुतीत चिंता आहे.


पालघर मतदारसंघातील पक्षीय बलाबल: पालघर लोकसभा मतदारसंघात खासदार शिवसेनेचा आहे. या पक्षाचा या मतदारसंघात एक आमदार आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. एक आमदार माकप आणि एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांचा सर्वपक्षीयांशी संबंध आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले असले, तरी पालघर लोकसभा मतदारसंघा बाबतचे पत्ते त्यांनी खुले केलेले नाहीत. त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आयोजकांची तारांबळ: महायुतीच्या आजच्या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यासाठी भव्य मंडप आणि खुर्च्या टाकण्यात आल्या होत्या. अडीच हजार लोक उपस्थित असले, तरी मेळाव्यातील बऱ्याच खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालं. तसंच सभा संपण्यापूर्वीही अनेक लोक उठून गेल्यानं आयोजकांची चांगलीच भंबेरी उडाली.


महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार: पालघर लोकसभेसाठी महायुतीत जो कोणी उमेदवार देईल, त्याला निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. राज्यात महायुतीने ४५ प्लस असं ठरविलं असल्यानं पालघर लोकसभा मतदारसंघातूनही महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार या महामेळाव्यात व्यक्त करण्यात आला. खा. गावित यांनी महायुतीतून जो उमेदवार देईल, त्याचे काम करण्यासाठी महायुती संघटित राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा आहे. कार्यकर्त्यांनी मोदी हेच उमेदवार आहेत असं समजून काम करावं असं आवाहन केलं.

हेही वाचा:

  1. ब्रिटिश एअरवेज वर्णद्वेषी? आयएएस अश्विनी भिडेंना भेदभावाची वागणूक, एअरवेजकडून दिलगिरी
  2. मिलिंद देवरा अन् माझ्या बंडात साम्य; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला 'त्या' ऑपरेशनचा किस्सा
  3. 'तुझ्या मैत्रिणीशी माझे संबंध जुळवून दे' म्हणत चुलत्याचा पुतणीवर हल्ला, संशयिताची आत्महत्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.