ETV Bharat / state

'तुझ्या मैत्रिणीशी माझे संबंध जुळवून दे' म्हणत चुलत्याचा पुतणीवर हल्ला, संशयिताची आत्महत्या

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 9:51 PM IST

Uncle attacked nephew
Uncle attacked nephew

Beed Crime News : 'तुझ्या मैत्रिणीशी माझे संबंध जुळवून दे' असं म्हणत 17 वर्षीय पुतणीवर चक्क चुलत चुलत्यानंच हल्ला केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. तसंच या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर संशयित आरोपीनं देखील आत्महत्या केल्यामुळं खळबळ उडाली आहे.

मुलीचे आईवडिलांची प्रतिक्रिया

बीड Beed Crime News : बीडमध्ये एका गावात 17 वर्षीय पुतणीवर चुलत चुलत्यानंच जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. 'तुझ्या मैत्रिणीशी माझे संबंध जुळवून देण्याची' मागणी चुलत्यानं पुतणीकडं केली. त्यानंतर ही घटना घडली आहे. गंभीर जखमी तरुणीवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणीचा गळा, छातीसह पोटावर चाकूनं चुलत्यानं 10 ते 12 वार केले आहेत. त्यामुळं तरुणी गंभीर जखमी झालीय. तसंच या घटनेमुळं गावातील सर्व मुलींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. संशयित आरोपीनं अगोदर देखील गावातील मुलीची छेडछाड केल्याचं आईवडिलांचं म्हणणं आहे.

चुलत चुलत्याविरोधात गुन्हा दाखल : बीडपासून काही अंतरावर असलेल्या गावात एक 17 वर्षीय तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. रविवारी तिच्या चुलत चुलत्यानं या तरुणीसोबत वाद घालत ‘तुझ्या मित्राशी माझे संबंध जुळवून देण्याची' मागणी केली. त्यानंतर तिच्यावर चुलत्यानं चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात चुलत चुलत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपीविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये 307 प्रमाणे गुन्हा दाखल झालाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीनं आत्महत्या केली आहे. याची नोंद बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये झालेली आहे - कैलास भारती, पोलीस निरीक्षक, पिंपळनेर पोलीस स्टेशन

संशयित आरोपीनं आत्महत्या केली. याची नोंद बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये झालेली आहे - बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय वैभव रणखांब

आरोपीचा घटनास्थळावरून पळ : आरोपीनं हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला होता. त्यामुळं तरुणी काही काळ रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळीच पडून होती. संशयित आरोपीनं यापूर्वी गावातील अनेक मुलींची छेड काढल्याचा आरोप मुलीच्या आईवडिलांनी केला आहे. आरोपीच्या छेडछाडीमुळं गावातील मुलींचं शिक्षण बंद करण्याची वेळ आली होती. त्यामुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

हेही वाचा -

  1. ११ कोटींचा गुटखा गुन्हे शाखेच्या पथकाने पालघर येथून केला जप्त
  2. अनैतिक संबंधाच्या संशयावरून रिक्षाचालकाचा खून, मृतदेह खाडीत फेकला
  3. 'अन्नपूर्णी'तील वादग्रस्त सीन प्रकरणी अभिनेत्री नयनतारासह आठ जणांविरुद्ध ठाणे जिल्ह्यात गुन्हा दाखल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.