ETV Bharat / state

अनैतिक संबंधाच्या संशयावरून रिक्षाचालकाचा खून, मृतदेह खाडीत फेकला

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 10:35 PM IST

Rickshaw Driver Murder
रिक्षाचालकाची हत्या

Rickshaw Driver Murder: आपल्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून नसिफ खानने (वय ३६) अमन शेख (वय २३) या व्यक्तीचा खून केला. त्यानंतर दोघांच्या मदतीने रिक्षातून मृतदेह ५ जानेवारीला पहाटे मिठी नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत मिठी नदीत मृतदेह आढळून आल्याने कुर्ला पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती. (Body dumped in creek) त्यानंतर या मृतदेहाची ओळख पटवून तिघांना गुन्हे शाखेच्या कक्ष ५ कडून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिली आहे.

आरोपींना करण्यात आलेल्या अटकेविषयी माहिती देताना राज तिलक रौशन

मुंबई Rickshaw Driver Murder: नफीस शराफत खान उर्फ कक्की (वय 36), मुकेश श्यामनारायण पाल (वय २५) आणि मोहम्मद साकीर सेद उर्फ जस्तीन (वय २३) अशी अटक आरोपींची नावे आहेत. (extramarital affair) मुख्य आरोपी नफीस खान याचा रिक्षा भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. तर मुकेश श्यामनारायण पाल आणि मोहम्मद साकीर सेद उर्फ जस्तीन हे रिक्षाचालक असून तिघेही गोवंडीतील बैंगणवाडी या परिसरात राहणारे आहेत. या तिघांना काल रात्री गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने अटक केली आहे. (killers arrested)

कट रचून केला खून: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत इसमाचे नाव अमन शेख (वय २३) असून अमनसह साकीर आणि मुकेश हे नफीसकडून रिक्षा चालवण्यासाठी घेत. दरम्यान रिक्षा परत देण्यासाठी नसिफच्या घरी नेहमी जात असे. त्यावेळी नसिफच्या पत्नीसोबत अमन गप्पा मारत असे. त्यावरून नसिफ याला आपल्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याबाबत अमनवर संशय होता. या संशयावरून अमनला ५ जानेवारीला मध्यरात्री जीवे मारले आणि मृतदेह मिठी नदीत फेकून दिला. झाले असे की, ५ जानेवारीला नेहमीप्रमाणे अमन रिक्षा देण्यासाठी नफीसकडे गेला असताना त्याला नफीसने विवाहबाह्य संबंधावरून जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी नफीसने मुकेश पाल आणि साकिर यांना रात्री आपल्या गोवंडीतील घरी बोलावून घेतले आणि अमनशी वाद घालून मध्यरात्री त्याची हत्या केली आणि मृतदेह मिठी नदीत तिघांनी फेकून दिला, असल्याची आरोपींनी पोलिसांना कबुली दिली आहे.

२०० हून अधिक मिसिंग केसेसची तपासणी: मिठी नदीत सापडलेल्या मृतदेहाची उकल करण्यासाठी कक्ष ५ ने मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यातील २०० हून अधिक मिसिंग केसेस पडताळून पाहिल्या. त्यावेळी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात एका पुरुषाची मिसिंग केस आढळून आली. अमनच्या बहिणीने ही मिसिंग तक्रार दाखल केल्यानंतर मिठी नदीत सापडलेल्या अमनच्या मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुख्य आरोपी असलेल्या नसिफने अमनच्या घरी जाऊन तुझा भाऊ माझी रिक्षा घेऊन १५ दिवस झाले आला नसल्याची तक्रार केली. त्यावर अमनच्या बहिणीच्या नवऱ्याने गोवंडीतील पार्किंगमध्ये उभी असलेली रिक्षा शोधून काढली. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तिन्ही आरोपींना कक्ष ५च्या आरोपींनी अटक केली असल्याची माहिती कक्ष ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांनी दिली आहे.

हेही वाचा:

  1. आमची निष्ठा देशासाठी, तर काहींची कुटुंबासाठी; पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका
  2. भारताला सर्वोच्च स्थानावर नेण्याचे बळ मिळो; गोदामाईच्या साक्षीनं पंतप्रधान मोदींचा संकल्प
  3. ठाकरे गटाच्या आमदारांनाही गोगावलेंचाच व्हिप लागणार; विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचं स्पष्टीकरण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.