ETV Bharat / state

Omicron Variant : नवा व्हेरियंट आढळलेल्या देशातील प्रवाशांना बंदी घालणे गरजेचे - अजित पवार

author img

By

Published : Nov 28, 2021, 6:51 PM IST

Updated : Nov 28, 2021, 8:49 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार

ओमिक्राॅन व्हेरियंट ( Omicron New Variant ) आला असून ज्या देशात सापडला तेथील प्रवाशांवर देशात येण्यास बंदी घालावी अथवा त्यांना क्वारंटाईन करावे लागेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी दिली आहे. ते कळवण - सुरगाणा विधानसभा मतदार संघातील १८३ कोटी रुपयांच्या विकास कामांचा ऑनलाईन भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

नाशिक - कोरोनाचा ओमिक्राॅन हा नवा व्हेरियंट ( Omicron New Variant ) आला असून ज्या देशात सापडला तेथील प्रवाशांवर देशात येण्यास बंदी घालावी अथवा त्यांना क्वारंटाईन करावे लागेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांनी दिली आहे. ते कळवण - सुरगाणा विधानसभा मतदार संघातील १८३ कोटी रुपयांच्या विकास कामांचा ऑनलाईन भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

प्रतिक्रिया देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार


'नवीन व्हेरियंटला कोरोना लस प्रभावी ठरत नाही'

जगभरात नवीन व्हेरियंटबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बैठक घेत सूचना दिल्या आहेत. या नवीन व्हेरियंटला कोरोना लस प्रभावी ठरत नाही असे समजते. नवीन लस अथवा औषध येईपर्यंत नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी पवारांनी व्यक्त केली आहे.

'आम्ही पाच वर्षाचा कार्यकाळही पूर्ण करु'

मागील दोन वर्षांमध्ये राज्य सरकारने विकासाच्या अनेक योजना राबविल्या आहेत. परंतु त्या योजनांकडे बघायला विरोधी पक्षाला वेळच नाही, असा टोला अजित पवार लगावला. नवीन विषाणू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. परंतु केंद्र सरकारने त्यासाठी काही निर्बंध तातडीने लावावेत, अशी मागणी देखील त्यांनी केली. आघाडी सरकारने दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे आणि पाच वर्षाचा कार्यकाळही पूर्ण करेलच, असा दावाही अजित पवारांनी केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना दिला सल्ला

तुटेपर्यंत ताणू नका, राज्य सरकार दोन पाऊले मागे आले, तुम्ही पण थोडे मागे या. योग्य तो विचार करा. महाराष्ट्राच्या जनतेला डोळ्यासमोर ठेवा. सगळ्यांचा विचार करा. एस.टी. कर्मचाऱ्यांनो तुम्हांलाही कुटुंब चालवायचे आहे. सरकारने आपल्या पगारात देखील वाढ केली आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर समितीचा अहवाल आल्यावर त्यावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येणारच आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. एसटी कर्मचारी आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवरून आपल्या संपावर ठाम आहेत. सरकारने काही अंशी मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच संप मागे न घेतल्यास कठोर कारवाईचाही इशारा दिला आहे. मात्र तरीही एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. या सर्व प्रकरणात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या काळाबद्दल बोलतांना त्यांनी समाधान व्यक्त केले. सरकार टिकणार नाही म्हणून देव पाण्यात ठेवणाऱ्यांनाही यामुळे उत्तर मिळाले, असे देखील यावेळी अजित पवार म्हणाले.

हेही वाचा - 2YearsOfMahaVikasAghadi : पुत्र, पुत्री आणि पुतण्याचे सरकार असल्याची आशिष शेलारांची टीका

Last Updated :Nov 28, 2021, 8:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.