ETV Bharat / state

Nana Patole : मणिपूर पेटवले तसे भाजपला संभाजी भिडेंच्या माध्यमातून महाराष्ट्रही पेटवायचा का? - नाना पटोले

author img

By

Published : Jul 29, 2023, 4:12 PM IST

Nana Patole Question To BJP
नाना पटोले

भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या जोरावर जसे मणिपूर पेटवले तसे संभाजी भिडेंच्या माध्यमातून महाराष्ट्रही पेटवायचा आहे का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे. ते आज नागपूर येथील निवासस्थानी बोलत होते.

नाना पटोलेंची संभाजी भिडेंविषयी प्रतिक्रिया

नागपूर: संभाजी भिडे सातत्याने महापुरुषांचा अगदी उघडपणे अपमान करत आहेत. ते कधी महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करत आले आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांनी संभाजी भिडेंवर कधीही कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही. आता संभाजी भिडे यांनी आपल्या सर्व मर्यादा ओलांडत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यानंतर अमरावतीमध्ये गुन्हा देखील झाला आहे. ज्याप्रकारे संभाजी भिडे देशातील महापुरुषांबद्दल बरळत आहेत त्याला भाजपचे समर्थन आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एवढं होऊन जर संभाजी भिडेला अटक झाली नाही तर बुधवारी आक्रमक भूमिका घेणार. भाजपने एकदा जाहीर करून टाकावं की संभाजी भिडेला त्यांचा पाठिंबा आहे. मग काँग्रेस आपल्या प्रकारे उत्तर देईल, असे नाना पटोलेंनी स्पष्ट केले.


पंतप्रधानांनी पुरस्कार नरेंद्र मोदी म्हणून स्वीकारावा: पुण्यातील पुरस्कार सोहळा हा खासगी संस्थेचा आहे. पंतप्रधान त्या कार्यक्रमात जात असेल तर आमचा विरोध असण्याचे कारण नाही; पण एखाद्या खासगी संस्थेचा पुरस्कार स्वीकार करण्याची पंतप्रधानांनी ही पहिलीच वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने पंतप्रधान या खुर्चीचा अपमान करत असल्याचे आरोप नाना पटोले यांनी केला आहे. त्यांनी पंतप्रधान म्हणून नाही तर नरेंद्र मोदी म्हणून पुरस्कार स्वीकारावा. शरद पवार यांनी जावे किंवा न जावे हे ठरवण्याचा अधिकार त्यांचा असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत.

ही वादळाच्या पूर्वीची शांतता: राज्यात केवळ ठाणेचं नाही तर गृहमंत्री फडणवीस यांच्या नागपुरातही कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनेत चार लोकांची हत्या होते. व्यापाऱ्यांना गोळ्या घालून ठार केले जात आहे. दुसरीकडे धर्मा-धर्माच्या माध्यमातून लोकांना लढवणे जाती-जातीमध्ये लढवणे सुरू आहे. ही सगळी परिस्थिती पाहता सत्ताधाऱ्यांनी जनतेला कदापि गृहीत धरू नये, ही वादळाच्या पूर्वीची शांतता असल्याचा इशारा नाना पटोलेंनी सरकारला दिला आहे.

हेही वाचा:

  1. Protest Against Sambhaji Bhide : यवतमाळमध्ये संभाजी भिडेंचे पोस्टर फाडले, पुरोगामी आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये झटापट
  2. Congress On Sambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक; गुन्हा दाखल करून अटकेची मागणी
  3. Bhim Army Protest In Amravati: अमरावतीत संभाजी भिडे यांचा निषेध; भीम आर्मीने केले आंदोलन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.