ETV Bharat / state

'मुंबईचा राजा' पाहण्यासाठी भाविकांची गर्दी, राम मंदिराचा साकारला देखावा

author img

By

Published : Sep 9, 2019, 4:42 AM IST

'मुंबईचा राजा' पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

सिंहासनावर आसनस्थ बाप्पाची राम स्वरुपातील लोभस मूर्ती येथे विराजमान आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदा ९२ वे वर्ष आहे.

मुंबई - सतत कोसळणाऱ्या पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर भाविक मोठ्या संख्येने गणेशोत्सव पाहण्यासाठी घराबाहेर निघाले आहेत. मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'गणेशगल्ली' मंडळाने यंदा उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील प्रस्तावित राम मंदिराचा देखावा साकारला आहे.

'मुंबईचा राजा' पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

हेही वाचा - अंबानी आणि बच्चन कुटुंबीयांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

सिंहासनावर आसनस्थ बाप्पाची राम स्वरुपातील लोभस मूर्ती येथे विराजमान आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदा ९२ वे वर्ष आहे.

हेही वाचा - देखावे पाहण्यासाठी पुण्यातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले

मुंबईचा राजा हा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. १० दिवस मोठ्या संख्येने भाविक गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. मात्र, सतत कोसळणाऱ्या पावसाने नागरिकांना घराबाहेर निघणे कठिण झाले होते. मात्र, आता पावसाने उसंत घेतल्यानंतर गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी भाविकांची रिघ लागली आहे.

Intro:मुंबई । सात दिवसापासून पडणाऱ्या पावसाने आज काही काळ विश्रांती घेतल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने गणेशोत्सव पाहण्यासाठी घराबाहेर निघाला आहे.
मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेलला गणेशगल्ली येथे उत्तरप्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिराची देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. सिंहासनावर आसनस्थ अशी बाप्पाची रामस्वरुपातील लोभस मूर्ती विराजमान आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदाचे ९२ वे वर्ष आहे. यंदा मंडळाने प्रतिकृती साकारली आहे.Body:मुंबईचा राजा हा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मुंबईच्या राजाच्या दर्शनाला १० दिवस मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मात्र पावसामुळे अनेक भाविकांना दर्शन घेता आले नव्हते. सकाळपासून पावसाने उघडीप घेतल्यानं मुंबईसह आसपासच्या परिसरातून भाविक मुंबईच्या राजाच्या दर्शनाला आले होते. गणेश भक्तांना नेहमीच प्रत्येक तीर्थस्थळाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. अशा गणेश भक्तांचा विचार करुन त्यांना ते मंदिर पाहता यावे यासाठी दरवर्षी मंडळांकडून प्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती साकारली जाते. यंदा अयोध्येतील राम मंदिर साकारले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.