ETV Bharat / state

देखावे पाहण्यासाठी पुण्यातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले

author img

By

Published : Sep 8, 2019, 10:14 PM IST

गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधून पुणेकरांनी गणरायासमोरील देखावे पाहण्यासाठी गर्दी केली. मानाचे ५ आणि इतर महत्वाचे गणपती शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत. त्यामुळे उपनगर आणि शहराच्या दुसऱ्या भागातून मोठ्या संख्येने नागरिक देखावे पाहण्यासाठी आले आहेत. रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधून पुणेकरांनी गणरायासमोरील देखावे पाहण्यासाठी केली गर्दी

रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधून पुणेकरांनी गणरायासमोरील देखावे पाहण्यासाठी केली गर्दी

पुणे - गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधून पुणेकरांनी गणरायासमोरील देखावे पाहण्यासाठी गर्दी केली. मानाचे ५ आणि इतर महत्वाचे गणपती शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत. त्यामुळे उपनगर आणि शहराच्या दुसऱ्या भागातून मोठ्या संख्येने नागरिक देखावे पाहण्यासाठी आले आहेत. पेठातील गणेश मंडळाच्या देखाव्यालाही नागरिकांची पसंती मिळत आहे. यासोबतच नागरिकांनी गणेशोत्सवानिमित्त विविध ठिकाणी भरलेल्या जत्रांचाही आनंद लुटला. पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील विविध रस्त्यांवर रविवारी सायंकाळपासूनच नागरिकांची प्रचंड गर्दी आहे.

रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधून पुणेकरांनी गणरायासमोरील देखावे पाहण्यासाठी केली गर्दी


येत्या गुरुवारी अनंत चतुर्दशी असून आता गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे मागील ३ दिवसांपासून देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. शहरातील कसबा पेठ, सदाशिव पेठ, शनिवार पेठ, गुरुवार पेठ या भागात सर्वाधिक गर्दी होत आहे. त्यातही आज रविवार असल्यामुळे सर्व प्रमूख रस्त्यांवर विशेष उत्साह दिसत असून गर्दीतही बाप्पासोबत सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांसोबत पोलीस मित्रही मोठ्या संख्येने रस्त्यावर सज्ज आहेत.

हेही वाचा - पुण्यात देखाव्यांवर 'चांद्रयान २' मोहिमेची छाप, राम मंदिराच्या प्रतिकृतीचीही निर्मिती

यावर्षी बहुतांश गणेश मंडळांनी तिसऱ्या दिवसापासूनच नागरिकांना पाहण्यासाठी देखावे सुरू केले होते. शहरातील बहुतांश गणेश मंडळासमोर यावर्षी पौराणिक, ऐतिहासिक यासह जिवंत देखावे साकारण्यात आले आहेत. देखाव्यातील भव्य उंच आणि आकर्षक मूर्ती पाहण्यासाठी बालगोपाळ गर्दी करीत आहेत. शिवाय लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या खेळणी, मनोरंजनाच्या ठिकाणी बालगोपालांची गर्दी दिसत आहे.

Intro:गौरी आणि घरगुती गणपतीच्या विसर्जनानंतर रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधून पुणेकरांनी गणरायासमोरील देखावे पाहण्यासाठी गर्दी केली.
मानाचे पाच आणि इतर महत्वाचे गणपती शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत..त्यामुळे उपनगर आणि शहराच्या दुसऱ्या भागातून मोठ्या संख्येने नागरिक देखावे पाहण्यासाठी आले आहेत. पेठातील गणेश मंडळाच्या देखाव्यालाही नागरिकांची पसंती मिळत आहे..यासोबतच नागरिकांनी गणेशोत्सवानिमित्त विविध ठिकाणी भरलेल्या जत्रांचाही आनंद लुटला. पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील विविध रस्त्यांवर रविवारी सायंकाळपासूनच नागरिकांची प्रचंड गर्दी आहे..
Body:येत्या गुरुवारी अनंत चतुर्दशी आहे..त्यामुळे आता गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत..त्यामुळे मागील तीन दिवसांपासून देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. शहरातील कसबा पेठ, सदाशिव पेठ, शनिवार पेठ, गुरुवार पेठ या भागात सर्वाधिक गर्दी होत आहे..
त्यातही आज रविवार असल्यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांवर विशेष उत्साह दिसत आहे..गर्दीतही बाप्पासोबत सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरत नाही..या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांसोबत पोलीस मित्रही मोठ्या संख्येने रस्त्यावर आहेत..
Conclusion:यावर्षी बहुतांश गणेश मंडळांनी तिसऱ्या दिवसांपासूनच नागरिकांना पाहण्यासाठी देखावे सुरू केले होते..पुणे शहरातील बहुतांश गणेश मंडळासमोर यावर्षी पौराणिक, ऐतिहासिक यासह जिवंत देखावे साकारण्यात आले आहेत. देखाव्यातीलभव्य उंच आणि आकर्षक मूर्ती पाहण्यासाठी बालगोपाळ गर्दी करीत आहेत..याशिवाय लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या खेळणी, मनोरंजनाची ठिकाणे याठिकाणी बालगोपालांची गर्दी झाली होती..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.